क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमक्या आणि या सगळ्या गोष्टी ट्रोल ज्याला म्हणतो हे खूप आदीपासून येत होतं. ते आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण, आता हे दोन हँडल्स नॅशनल नाहीत, ती इंटरनॅशनल अकाऊंट आहेत, असं त्या म्हणाल्या. लोकं दाऊदचं नाव घेऊन धमक्या देत आहेत. ती लोकं भारताला शिवीगाळ करत आहेत, भारताच्या सरकारला शिवीगाळ करत आहेत. माझ्या पतीला शिवीगाळ करत आहेत, आमच्या मुलांना शिवीगाळ करत आहेत. आमच्यावर अॅसिड हल्ला झालं तर काय असा विचार मनात येतो, त्यामुळं आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.
सीबीआय आज आर्यन खान प्रकरणी मुंबई हायकोर्टात उत्तर दाखल करणार आहे. समीर वानखेडे यांना हायकोर्टानं ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
समीर वानखेडे यांनी हायकोर्टात त्यांची बाजू मांडताना बदल्याच्या भावनेतून कारवाई केली जात असल्याचं म्हटलं होतं. माझ्यावर यापूर्वी देखील भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. ते त्यावेळी सिद्ध झालं नव्हते, असं वानखेडे म्हणाले होते. सीबीआयला देखील या प्रकरणी पुरावा मिळणार नाही, असं वानखेडे म्हणाले. सीबीआयनं समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी आर्यन खानला सोडण्यासाठी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली.
काही दिवसांपासून ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. आर्यन खान प्रकरणात वानखेडेंवर गंभीर आरोप झाल्याने सीबीआयने वानखेडें विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या घरावर छापादेखील टाकण्यात आला होता. सीबीआय विरोधात वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली होती. यांनतर, त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद याच्यासारखी आपलीही हत्या होऊ शकते अशी शक्यता वानखेडेंनी वर्तविली होती. आता त्यांना ट्विटरवरून धमकी मिळाल्याने वानखेडेंनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.