• Sat. Sep 21st, 2024

काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन घेतला जाणार निर्णय

काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन घेतला जाणार निर्णय

Kalaram Temple Dress Code : नाशिकमधील प्रसिद्ध काळामंदिरातही ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

 

kalaram temple
काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड?
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी : सध्या राज्यभरात मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी पूर्ण कपड्यांनिशी यावे, यासाठी ड्रेसकोड अनिवार्य करण्यावर चर्चा होत आहे. मंदिरात पर्यटक तोकड्या कपड्यांमध्ये येतात. यावर पर्याय म्हणून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांनी पूर्ण कपड्यांनिशी यावे, यासाठी ड्रेसकोड अनिवार्य करण्याचा विचार काळाराम मंदिर संस्थानही करीत आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे.नाशिकचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून पंचवटी परिसराची ओळख आहे. या परिसरातील रामकुंड, कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि तपोवनातील मंदिरे येथे नाशिकला पर्यटक हमखास भेट देतात. मंदिरात येणारे भाविक मंदिराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पर्यटकांकडून ते होत नाही. त्यामुळे मंदिरातील संस्थानांनीच याबाबत पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

नाशिकला येणारे भाविक व पर्यटक पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरात येत असल्याने मंदिर परिसर कायम गजबजलेला असतो. या मंदिरातही तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपले जात नाही, असा काही भाविकांचा आक्षेप आहे. त्यामुळे काळाराम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात यावा, असे मत व्यक्त केले जाऊ लागले आहे.
नाशिकमधील मंदिरांतही लवकरच वस्त्रसंहिता? ‘या’ विख्यात मंदिरांत नियम लागू करण्याची शक्यता
राज्यातील काही मंदिरांत तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश करू दिला जात नाही. त्याप्रमाणे काळाराम मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्याबाबत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed