• Mon. Nov 25th, 2024
    Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…

    पुणे (आंबेगाव) : भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघालेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब कारमधून जात असताना भीमाशंकर जवळ असलेल्या पोखरी गावच्या हद्दीत त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कुटूंबियांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तोडकर यांचे बंधू दुसऱ्या कारमध्ये असल्याने त्यांनी तातडीने कारवळ येत त्यांना बाहेर काढले.

    मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंब भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले होते. घरातीलच दोन कार असल्याने ते आणि त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर भीमाशंकर या ठिकाणी निघाले होते. सचिन तोडकर यांच्याकडे त्यांची डस्टर क्रमांक एमएच ४३ एएन ६९८६ कार होती. तर भावाकडे दुसरी कार होती.
    Akash-Shloka Ambani : अंबानी कुटुंबात परी अवतरली, श्लोका अंबानींनी दिला कन्येला जन्म, दुसऱ्यांदा बनले माता-पिता
    डिभे धरणावर फिरून ते भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले असता पोखरी गावचे हद्दीत दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सचिन तोडकर यांच्या कारच्या पुढील खालच्या बाजुतून अचानक धूर आणि जाळ निघू लागला. सचिन तोडकर ड्रायव्हिंग करत असल्याने त्यांवा ही बाब लक्षात आली नाही. मात्र, त्यांच्याच पाठीमागे असलेला त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर यांना जाळसह धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत फोन करून सचिन तोडकर यांना तात्काळ माहिती दिली.

    सचिन तोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने कार रत्यावर थांबवली आणि त्यांची पत्नी, मुलगा, भाचा, दोन लहान मुली यांना बाहेर काढले. तोपर्यंत कारच्या पुढील भागात आग लागली होती. कारमध्ये असलेल्या पाणीने आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपयश आलं. तेथूनच जवळ असलेल्या हॉटेलचे मालक ज्ञानेश्वर सोळसे यांनी पाण्याचा टँकर आणून ती आग विझवली.

    या आगीत कारचा पुढील भाग पूर्णपणे जळाला असून कारचे मोठे नुकसान झालं आहे. दरम्यान, “मागे असलेले हनुमंत तोडकर यांनी फोन केल्याने मोठी दुर्घटना टळली आणि दैव बलवत्तर म्हणून आमचे कुटुंब वाचले”, अशी प्रतिक्रिया पत्रकार सचिन तोडकर यांनी दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीची आग विझवण्यात आली.

    कल्याण लोकसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार मैदानात; शिंदेंना पराभवाचे तोंड दाखवणार?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed