रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील असलेली आयेशा इब्राहिम काझी हिने यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) मोठे उज्वल यश संपादन केल आहे. यूपीएससीमध्ये मोठे यश मिळवणारी रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. बालपण आणि शिक्षण सगळं मुंबईतच झालं. ती ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. लहानपणापासूनच तिला आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा होती. तिची जिद्द व अभ्यास करण्याचे नियोजन यामुळे तिला यूपीएससी परीक्षेत हे यश मिळू शकलं आहे. ५८६ व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली आहे.काझी कुटुंब हे मूळचे कोकणातील दापोली तालुक्यामधील अडखळ जुईकर मोहल्ला येथील आहे. हे कुटुंब गेले अनेक वर्ष ठाणे कळवा येथे व्यवसायानिमित्त स्थायिक आहे. आयेशाचे वडील व्यवसायिक आहेत तर आयेशाची आई अरबी भाषेतून उर्दू भाषेचे ट्रान्सलेशनचे क्लासेस घेते. आयेशा काझी ही लहानपणापासूनच गुणवत्ता यादीमध्ये चमकत आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत तिने ९४ टक्के गुण मिळवले होते तर इयत्ता बारावी मध्ये तिने ८९.५४% गुण मिळवले होते. पदवी पर्यंतचे शिक्षण तिने कला शाखेतून इतिहास हा विषय घेऊन पूर्ण केले आहे.
आपल्या यशाची श्रेय आई-वडिलांना दिले आहे. तसेच हज हाऊसमध्ये विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेल्या कोचिंग क्लासेसमधून तिने आपल्याला मोठे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. जुनिअर कॉलेजमध्ये असताना आयेशामधील गुणवत्ता पाहून तिच्या शिक्षक प्राध्यापक इम्रान सर यांनीही आयेशाला मार्गदर्शन केले होते.
आपल्या यशाची श्रेय आई-वडिलांना दिले आहे. तसेच हज हाऊसमध्ये विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेल्या कोचिंग क्लासेसमधून तिने आपल्याला मोठे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. जुनिअर कॉलेजमध्ये असताना आयेशामधील गुणवत्ता पाहून तिच्या शिक्षक प्राध्यापक इम्रान सर यांनीही आयेशाला मार्गदर्शन केले होते.
यूपीएससी परीक्षेची तयारी २०१९ पासून तिने सुरू केली होती. तिने बाळगलेली जिद्द व अभ्यासासाठी केलेले परिश्रम यामुळे तिला चौथ्या प्रयत्नात हे यश मिळालं. यूपीएससी परीक्षेत कोकणातील विद्यार्थी चमकले पाहिजेत यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचे नियोजन करत एकाग्रता केंद्रित करणे आवश्यक आहे. अभ्यासाचे नियोजन केल्यास यूपीएससी या अवघड परीक्षेतही यश मिळू शकते असं मत आयेशा हिने यावेळी व्यक्त केलं.
यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची तयारी करताना आपल्याला खूप जनरल नॉलेज मिळतं. अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच चालू घडामोडींचेही ज्ञान मिळते. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे नियोजन पूर्वक लक्ष देऊन तयारी केल्यास यूपीएससी परीक्षाही पास होता येते.