• Sat. Sep 21st, 2024

शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार संपर्कात,राऊतांनी ज्यांचं नाव घेतलं ते मंत्री म्हणतात…

शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार संपर्कात,राऊतांनी ज्यांचं नाव घेतलं ते मंत्री म्हणतात…

सातारा : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. राऊत यांनी त्यांची बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची नावं घेतली होती. ‘खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. ‘राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते.

‘गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासोबत अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य १००१ टक्के खोटे आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
भाजपच्या नव्या प्लॅनमुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; विश्वासात न घेताच मोठा निर्णय

महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
IPL 2023 Final: पावसानं आजही खेळ बिघडवला तर काय? CSK vs GT दोन्ही टीमपैकी विजेता कोण? अपडेट समोर

विनायक राऊत काय म्हणाले?

शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांच वक्तव्य.. बाकीचे तानाजी सावंत आंकाडतांडवानं बोलतात, तानाजी सावंताना बजेटचं मिळत नाही… त्यामुळं म्हणतात आगीतून फुफाट्यात पडलेलो आहे, असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे.. त्यामुळं आता भारतीय जनता पक्षानं शिंदे गटाच्या लोकांना ज्या पद्धतीनं नामोहरम करण्यास सुरुवात केलेली आहे.. शिंदे गटातील लोकांचा असंतोष एवढा उफाळून आलेला आहे. आमच्याकडे अनेक यामध्ये मंत्री असलेल्या लोकांनी सुद्धा उद्धव साहेबांकडे संपर्क साधायला सुरुवात केली आहे, असं विनायक राऊत म्हणाले. काही जणांनी प्रत्यक्ष आमच्यापैकी काही जणांशी बोलणं देखील सुरु केलेलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.
IPL Final 2023 च्या राखीव दिवशीही पाऊस पडणार का, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed