• Wed. Mar 11th, 2026
    Mumbai Local : बॉयफ्रेंडने ब्लॉक केलं, गर्लफ्रेंडकडून टोकाचं पाऊल; धावत्या मुंबई लोकलमधून खाडीत उडी

    Vashi Creek Young Girl Jumped : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियकराने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचललं, मात्र स्थानिक मच्छीमारांनी देवदूतासारखे धावून येत तिचे प्राण वाचवले.

    वाशी खाडी लोकलमधून तरुणीची उडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : प्रियकराने फोनवरुन संपर्क तोडल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणीने चालत्या लोकलमधून खाडीत उडी मारल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सुदैवाने, तेथील मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदत केल्यामुळे या तरुणीचा जीव वाचला. ही घटना सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास वाशी क्रिक या पुलावर घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी चेंबूर येथील रहिवासी आहे. ती हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास करत असताना लोकल ट्रेन वाशी खाडी पुलावर आली. याचवेळी रागाच्या भरात तिने लोकलच्या दरवाजातून थेट खाडीत उडी घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, तिच्या खांद्यावर असलेल्या बॅगमध्ये हवा भरल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली. दरम्यान, ही घटना पाहताच वाशी गावातील मच्छीमारांनी तात्काळ धाव घेतली. मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोट घेऊन काही मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचत तरुणीला पाण्यातून बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
    Maharashtra TimesCrime News : टॅक्सी चालकाला संपवल्यानंतर इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचे वकिलाला अनेक कॉल, सेल्फ डिफेन्सच्या दाव्यावर पोलीस साशंक

    प्रियकराने काहीही न सांगता…

    तरुणीला सुरक्षित किनाऱ्यावर आणल्यानंतर तिला वैद्यकीय मदत देण्यात आली. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत तरुणीने सांगितलं की, तिच्या प्रियकराने काहीही न सांगता फोन आणि सामाजिक माध्यमांवरुन तिला ब्लॉक केले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच रागाच्या भरात तिने चालत्या लोकलमधून उडी मारण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून तरुणीला वाचवणाऱ्या मच्छीमारांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    Maharashtra TimesNagpur News: कुत्रा चावताच म्हैस आक्रमक झाली; परिसरात प्रचंड धुमाकूळ; ९२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, १० जण जखमी

    उष्णतेमुळे नागरिक हैराण

    फेब्रुवारी महिन्याअखेरीस बसणाऱ्या उन्हाच्या झळा मार्च महिना येताच आणखी वाढल्या आहेत. होळीनंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील पारा चढत असून रविवारी, 8 मार्च रोजी, अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत होती. नवी मुंबईत रविवारी दुपारी तर तापामानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. सोमवारी, 9 मार्च 2026, दिवसभर हवामान कसं असेल ते जाणून घ्या.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा