• Mon. Nov 25th, 2024
    शिकण्याच्या वयात गुन्हेगारीत एन्ट्री, कीटक गँगचा माज उतरवला, जिथे गुन्हा केला तिथूनच धिंड!

    पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारी डोके वर काढत असताना आता पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे. गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या कीटक टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी चिंचवड येथील गुंडाविरोधी पथकाने कारवाई करत त्या गुंडांची तळेगाव दाभाडे येथून धिंड काढली. त्यामुळे गुन्हेगारीचा मावळ पॅटर्न म्हणून जे मावळ बदनाम झालं तिथे पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसवण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणात पोलिसांनी कीटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय १९) वैभव राजाराम विटे (२५, दोघेही रा. तळेगाव दाभाडे) विशाल शिवाजी गुंजाळ (२०, रा. वराळे) प्रदीप वाघमारे (२०, रा. वडगाव) रुतिक मेटकरी (२०, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामुळे तळेगाव दाभाडे येथील गुंडांना चांगलीच चपराक बसल्याचे पहायला मिळत आहे.

    पोरं पोहोयला गेली, तिथे सांगाडा दिसला, त्यांनी गावभर सांगितलं अन् अभागी मातेने हंबरडा फोडला!
    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कीटक भालेराव आणि त्याच्या साथीदारांनी तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा काही मुलींची नावे घेऊन गल्लीत आरडाओरड केला होता. तसेच एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण देखील केली होती. तसेच संबधित महिलेच्या दिराला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून दीड हजार रुपये काढून घेतले. तसेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

    वडिलांना मारल्याचा राग, मुलाने कट रचला आणि आवारेंचा काटा काढला, आरोपीने सगळं सांगितलं

    पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुंडा शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक करून त्यांनी ज्या ठिकाणी दहशत निर्माण केली होती. त्याच ठिकाणाहून त्यांची धिंड काढली. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

    दारू पिऊन जेवायला आला, उधार जेवण मागितलं; मालकाने नकार देताच चाकूने भोसकलं
    या टोळीचा प्रमुख असलेला कीटक भालेराव याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जे गुन्हा करतील त्यांची हयगय करू नका अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुंडगिरी संपण्यास मदत होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed