फॅशनला विरोध नाही, फॅशन करायची असेल तर मंदिराबाहेर करा. फलक म्हणजे हा आमचा हट्ट आणि नियम. तो प्रत्येकाला पाळावाच लागेल. प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. आणि नियमांमुळेच आपण नियंत्रित. आमचाही फलकाचा नियम आहे, असं भाविकांसाठी लावण्यात आलेल्या फलकाचे जनक अमळनेर मंदिर ग्रहण संस्थांचे ट्रस्टी डीगंबर महाले यांनी स्पष्टच सांगितलं.
‘कुणीही टीका केली म्हणून आम्ही नियम बदलणार नाही’
प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, त्याच प्रमाणे आपली सुद्धा संस्कृती आहे, कुणी कसेही कपडे घालावे त्याला विरोध नाही. मात्र मंदिरात तोकडे, उत्तेजक तसेच अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही तो नियम केला असून हा फलक लावला असल्याचं डीगंबर महाले यांनी म्हटलं. फॅशनच्या विरोधात नाही, कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर आम्ही घाला घातलेला नाही. शाळेत मुलांना ड्रेस कोड असतो त्यावर आपण काही बोलत नाही कारण तो त्यांचा नियम आहे. त्याच प्रमाणे मंगळग्रह मंदिर याठिकाणी भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा नियम आम्ही केला असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तो पाळावाच लागेल, असं डिगंबर महाले यांनी म्हटलं आहे. आणि तोपर्यंत आणि मी हे मंदिर संस्थान आहे, तोपर्यंत हा नियम बदलणार नाही, असंही डिगंबर महाले यांनी स्पष्ट केलं. या फलकावरुन अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराच्या निर्णयाने अनेकांनी स्वागत, कौतुक केलं, तर अनेकांनी टीका केल्या. मात्र टीका करणाऱ्यांचा आम्ही आदर करतो. जसा शाळेत गणवेशाबाबत नियम असतो, आपण त्याठिकाणी काहीच बोलत नाही, तसा हा आमचा नियम आहे, त्यावर कुणीही टीका केली म्हणून आम्ही तो बदलणार नाही, असं मंदिराचे ट्रस्टी डिगंबर महाले यांनी फलकावरून टीका करणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं.
कसेही कपडे घालून आपण आलो तर आशीर्वाद देताना देव सुद्धा आपल्याला हसेल, त्यामुळे जी आपली संस्कृती आहे, ती आपण जपलीच पाहिजे. मंदिराबाहेरचा फलक आहे तो सर्वच तीर्थक्षेत्र, सार्वजनिक ठिकाणी लागयला पाहिजे. कपड्यांवरून भक्ती ठरत नाही, मात्र प्रत्येकाने संस्कार आणि संस्कृती जपली पाहिजे. किमान देवाच्या ठिकाणी तरी पूर्ण कपडे घालून यावं, असं मत काही भाविकांनी व्यक्त केलं आहे.
या फलकाचा उशिरा का होईना पण नक्कीच चांगला परिणाम होईल. ज्यांना अंगप्रदर्शन करण्याची सवय आहे, त्यांच्यावर या फलकाचा कुठलाही परिणाम होणार नाही, असंही काही भाविक महिलांनी म्हटलं.
आजची पिढी जी चुकीच्या मार्गावर जात आहे, ती चांगल्या मार्गावर येण्यासाठी हा फलक महत्त्वपूर्ण ठरेल. आपली संस्कृती जपण्यासाठी असं करणं ही काळाची गरज आहे. याचा निश्चितच बदल पुढील काळात पाहायला मिळेल. फलक लावण्याचा निर्णय हा योग्यच असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.