• Fri. Mar 13th, 2026
    अजितदादांमधला इंजिनिअर जागा झाला, चूक हेरली, हॉटेल मालकाचा बाथरुममध्ये अंघोळ करायला लावली!

    पुणे : विधानसभेचे विरोधी अजित पवार हे आपल्या मिश्किल आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाची ओळख तमाम बारामतीकरांना किंबहुना पुणे जिल्ह्याला देखील आहे. एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा आला आहे.

    भोरमधील एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनाला गेलेल्या अजितदादांनी हॉटेल मालकालच बाथरुममध्ये अंघोळ करण्याचा इशारा दिला. हॉटेलमधील बाथरुमची स्पेस कमी असल्याचं अजितदादांच्या लक्षात आलं. त्यांच्यातला इंजिनिअर जागा झाला. त्यांनी हॉटेल मालकालाच बाथरुममध्ये पाठवलं आणि करा बरं अंघोळ असं मिश्किलपणे सांगितलं. अजितदादांच्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

    नेमकी घटना काय?

    भोर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या ‘ईफोटेल’ या पंचतारांकित हॉटेलच्या उदघाट्नासाठी पुणे सातारा महामार्गावरील सारोळे अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी रिबीन कापून, दीपप्रज्वलन करत उदघाट्न करून हॉटेलची पाहणी केली.

    पाहणी दरम्यान हॉटेल रूम्सच्या बाथरूममध्ये असणारी स्पेस आणि शॉवरचं लोकेशन यासंबधी असणारी त्रुटी अजित पवारांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्रुटी लक्षात येताच अजित पवार यांनी हॉटेलच्या संचालकांनाच बाथरूममध्ये अंघोळ करण्याची कृती करायला सांगितली. अजितदादांच्या मिश्किल अंदाजाने उपस्थितांमध्ये एखच खसखस पिकली.

    अजित पवारांच्या या चाणाक्ष नजरेला आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीत असणाऱ्या बारीक निरीक्षणाला उपस्थितांनी दाद दिली. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अभ्यासूवृत्तीचा आणि मिश्किलपणाचा प्रत्यय पुन्हा भोरवासियांना आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *