Chhatrapati Sambhajinagar News: अन्न व औषध प्रशासनाचा धडाका कायम असून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.
एफडीएची मोठी कारवाई, ‘हॉटेल मनी प्लांट’चा परवाना रद्द; बनावट पनीर आणि अस्वच्छतेमुळे अन्नसेवा बंद(फोटो– Lipi)
छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘सुरक्षित अन्न’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने वाळूज एमआयडीसी परिसरातील एका नामांकित हॉटेलवर कडक कारवाई केली आहे. वडगाव कोल्हाटी येथील ‘हॉटेल मनी प्लांट’मध्ये मिळणारे पनीर असुरक्षित आणि आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तसेच स्वयंपाकघरात तीव्र अस्वच्छता आढळून आल्यामुळे प्रशासनाने या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेलमधून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत सखोल तपासणी केली असता, त्यामध्ये दुग्धजन्य स्निग्धांशाचे (दूध फॅट) प्रमाण आवश्यक मानकांपेक्षा अत्यंत कमी आढळले. त्याऐवजी मानवी आरोग्याला अपायकारक असणाऱ्या ‘वनस्पतीजन्य चरबीची’ (व्हिजिटेबल फॅट) गंभीर भेसळ करण्यात आल्याचे सिद्ध झाले. यामुळे अन्न विश्लेषकांनी हे पनीर खाण्यासाठी अत्यंत ‘असुरक्षित’ घोषित केले आहे. केवळ भेसळयुक्त पनीरच नाही, तर प्रत्यक्ष पाहणीदरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कीटकांचा वावर, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पाण्याच्या दर्जाची चाचणी न करणे आणि अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची अनुपस्थिती अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. याप्रकरणी प्रशासनाने बजावलेल्या नोटीसला हॉटेल चालकाने निर्धारित वेळेत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांनी परवाना निलंबनाचे आदेश दिले.
अन्न निर्मिती व विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश
या धडक कारवाईनंतर हॉटेलमधील सर्व प्रकारची अन्न निर्मिती, साठवणूक आणि ग्राहकांना अन्न पुरवणे तात्काळ बंद करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाची लेखी परवानगी आणि त्रुटींची पूर्णता केल्याशिवाय हॉटेल पुन्हा सुरू केल्यास कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा