• Sat. Sep 12th, 2026

Pravin Darekar: शिवीगाळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल, गणेशोत्सवाचे भान ठेवून आंदोलनाचे आवाहन

Manoj Jarange Patil: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

शिवीगाळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल, गणेशोत्सवाचे भान ठेवून आंदोलनाचे आवाहन(फोटोLipi)
​छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि प्रस्तावित मुंबई दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. “राज्यातील एवढ्या मोठ्या समाजाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने महायुती सरकारने सुरुवातीपासूनच लवचिक भूमिका घेत पूर्ण सहकार्य केले आहे. १४ पैकी तब्बल १२ मागण्या सरकारने पूर्ण केल्या असून, उर्वरित १-२ मागण्या कायद्याच्या चौकटीत अडकल्या आहेत. त्यावरही मार्ग काढण्यासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे,” असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आणि आरक्षणासाठी सरकार म्हणून जेवढे काम केले, तेवढे आजवरच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारचे सर्व प्रमुख नेते मराठा समाजासोबत ठामपणे उभे आहेत. तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत? कोण भेटायला येते यापेक्षा सरकार प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवतेय की नाही हे महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

​”गणेशोत्सवाला गालबोट लागू नये; शिवीगाळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”

मराठा आंदोलकांच्या मुंबई आंदोलनावर भाष्य करताना दरेकर म्हणाले की, “लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा आणि मुंबईत जाण्याचा अधिकार आहे. मात्र, आगामी काळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने साजरा होणारा गणेशोत्सव आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे आपल्या आंदोलनामुळे या सणाला कुठलीही अडचण येणार नाही, तसेच राज्यात कसलीही अराजकता किंवा वातावरण खराब होणार नाही याची दक्षता आंदोलकांनी घेतली पाहिजे.” त्याचप्रमाणे आंदोलनातील भाषेवर बोट ठेवत दरेकर म्हणाले की, आक्रमक आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र व्यासपीठावरून कोणाच्या आई-बहिणीचा उद्धार करणे किंवा खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच स्वीकारत नाही. सुसंवाद आणि सामंजस्यानेच प्रश्न सुटतात, असंही दरेकर म्हणाले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा