नागपुरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने सूनेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत सूनेचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी सासऱ्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
नागपूर : सुनेने मुलावर जादूटोणा करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असून, आणि जादूटोणा केल्यामुळे आपली किंवा कुटुंबातील व्यक्तीची तब्येत खराब राहत असल्याचा संशयातून संतप्त झालेल्या 70 वर्षीय सासऱ्याने सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी परिसरात शनिवारी ही घटना घडली. हल्ल्यानंतर पोलिसांकडून पकडले जाऊन शिक्षा होण्याच्या भीतीने आरोपी सासऱ्याने घरामागील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत महिलेचे नाव लक्ष्मी रविशंकर पाली (वय 42) असून आरोपी सासऱ्याचे नाव नाथूलाल भगवान पाली (वय 70) असे आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाथूलाल यांचा मुलगा रविशंकर याचे 2019 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर नाथूलाल यांचा सुनेसोबत कौटुंबिक कारणांवरून वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच लक्ष्मी हिने जादूटोणा केल्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच आपली किंवा कुटुंबातील व्यक्तीची तब्येत खराब राहत असल्याचा संशय नाथूलाल यांना होता. या संशयातून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याची माहिती आहे. शनिवारीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nagpur News : हायकोर्टाचे विश्वास नांगरे पाटील यांना महत्त्वाचे निर्देश, डीजे प्रकरणावर कोर्टात काय-काय युक्तिवाद?घटनेच्या वेळी लक्ष्मीची मुलगी नोकरीसाठी घराबाहेर गेली होती, तर तिचा मुलगाही काही कामानिमित्त बाहेर होता. घरात इतर कोणी नसल्याची संधी साधून लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धूत असताना नाथूलाल याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लक्ष्मीला बचावाची संधी मिळाली नाही. डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नथूलाल याला रुग्णालयात केले दाखल
या हल्ल्यानंतर नाथूलाल यांनी त्यांचाच घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि यशोधरानगर पोलिसांना माहिती दिली. नागरिकांच्या मदतीने नाथूलाल याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Amruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य
घटनास्थळी पोलीस दाखल
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने घेतले असून लक्ष्मी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
आरोपी नाथूलाल याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्याकडून या हल्ल्यामागील कारणांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुनेने जादूटोणा केल्याचा संशय हेच हत्येमागील मुख्य कारण होते का, की त्यामागे दीर्घकाळापासून सुरू असलेला कौटुंबिक वाद किंवा अन्य काही कारण होते, याचा तपास यशोधरानगर पोलिसांकडून सुरू आहे. अंधश्रद्धेच्या संशयातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे पाहुणे ले-आऊट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा