डीजे निर्बंधांचा आदेश कागदावरच नको. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश हायकोर्टाने नागपूर पोलिसांना दिले आहेत. हायकोर्टाने नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : डीजे आणि साऊंड सिस्टिमच्या दणदणाटामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. डीजेवरील निर्बंध केवळ कागदावर ठेवून चालणार नाही, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, ही कारवाई केवळ नागपूर शहरापुरती मर्यादित न ठेवता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील दहा जिल्ह्यांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर त्रिमूर्तीनगर नगर मंडळाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील तुषार मंडलेकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतेच भारतीय न्याय संहितेतील कलम 163 अंतर्गत डीजे, साऊंड सिस्टिम आणि ध्वनी प्रदूषणावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केल्याची माहिती न्यायालयाला दिली.
डीजेवर निर्बंध असताना डीजे वाजवल्याचा दावा
मात्र, अधिसूचना जारी केल्यानंतरही दहीहंडी तसेच मारबत मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ पुरावे आणि संबंधित बातम्या न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या. या पुराव्यांच्या आधारे नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. केवळ आदेश काढून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, हे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे याचिककर्त्याचे वकील तुषार मंडलेकर यांनी सांगितले.
याचिकाकर्त्यांचे वकील काय म्हणाले?
तुषार मंडलेकर यांनी न्यायालयात सांगितले की, उत्सवांच्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर आणि शांततेवर परिणाम करणाऱ्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. डीजे आणि डॉल्बी सिस्टिमकडून निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणा जप्त करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत पोलिसांनी केवळ निर्बंधाचे आदेश जारी करून थांबू नये, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले.
Amruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य
न्यायालयाचे कारवाईचे आदेश
सुनावणीदरम्यान मारबत उत्सवातील डीजेच्या वापराचा व्हिडीओही न्यायालयासमोर सादर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची दखल घेत संबंधित आयोजकांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवर कारवाई करून त्यांची जप्ती करण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले.
न्यायालयाचे पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश
दरम्यान, ध्वनी प्रदूषणाविरोधातील ही कारवाई केवळ नागपूरपुरती मर्यादित राहू नये, अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्येही डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पुढील 15 दिवसांत या संदर्भात प्रभावी कारवाई करून त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना 22 सप्टेंबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह संपूर्ण विदर्भात डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधातील पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा