• Sat. Sep 21st, 2024
रेल्वेत चढताना खाली पडला, अनर्थ घडणार इतक्यात RPF जवान धावला, थरार सीसीटीव्हीत कैद

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अलगट आलं असतं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवर एक व्यक्ती चालत्या नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेल्याने प्रवाशी व्यक्ती ट्रेन अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडू लागला. पण, रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानानं म्हणजेचं या व्यक्तिचा जीव वाचला आहे. हा संपूर्ण प्रकार काल रात्री साडे सात वाजताच्या सुमारास घडला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काही प्रकार काल अकोला रेल्वे स्थानकावर दिसून आला. या घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यातं आली, तसेच स्थानकावर मोठी गर्दी झाली होती, काही वेळानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर काल शुक्रवारी (२६मे) सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूर-पुणे एक्स्प्रेस आली असता, या गाडीतून अमरावती ते नागपूर असा प्रवास करत असलेले प्रवासी अलोक कालीचरण बोरकर हे सामान घेण्यासाठी प्लॅटफॉर्म उतरले. सामान घेईपर्यत रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना होऊ लागली, आपली गाडी सुटल्याचे पाहून अलोक हे पळत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले. चालत्या रेल्वेच्या दरवाजातून चढण्याचा प्रयत्न करू लागले. दरवाज्यातून वर चढत असतानाच त्यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडू लागले. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या कर्तव्यावर असलेले आरपीएफ पोलिस बाबूलाल धुर्वे यांनी हे पाहताच ते त्या दिशेनं धावू लागले. अलोक हे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधोमध अडकण्याची भीती असतानाच सुदैवानं धुर्वे यांनी त्यांना बाजूला ओढले.
बच्चू कडूंनी अमरावती लोकसभेवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला, महायुतीची डोकेदुखी वाढणार?

कष्ट दिसले नाही तुला थकलेल्या बापाचे; कवितेतून अमोल मिटकरींचा विरोधकांवर निशाणा

आरपीएफच्या पोलिसाच्या प्रसंगावधानानं अलोक या प्रवाशाचा जिव वाचला आहे. मात्र, हे दृष्य पाहून उपस्थित रेल्वे स्थानावरील सर्व प्रवाशांना धक्का बसला. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वे स्थानाकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर रेल्वे चालकाला या घटने संदर्भात माहिती मिळताच लागलीच ट्रेन देखील थांबविण्यात आली. आरपीएफ जवानाच्या समयसूचकतेमुळं वाचलेले अलोक नंतर पुढच्या प्रवारक्ताच्या नात्यानेच घात केला; सख्ख्या मामाची मुलं जीवावर उठली, फिल्मी स्टाइल कट रचून हत्या!
दरम्यान, अकोला रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेमध्ये चढणे-उतरणे, रेल्वे लाईन क्रॉस करणे, असे कृत्य करू नये, असं आवाहन केलं आहे.Congress News : नानांची विकेट जाणार, थोरातही पदावरून हटणार? नवीन प्रदेशाध्यक्ष ठरला, काँग्रेसचा प्लॅन तयार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed