• Sat. Sep 21st, 2024
साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा, ना क्लास, ना कोणती अकॅडमी, घरीच केला अभ्यास, UPSC त मोठे यश

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये देशात व राज्यातही मुलींनी बाजी मारली आहे. त्यात सातारा जिल्ह्यातूनही वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम हिने देशात ५६० व्या रँकसह यश मिळवले आहे. प्रतीक्षा ही शेतकरी कुटुंबातील असून तिने स्वतःच जिद्दीने हे यश मिळवले आहे.प्रतीक्षाने लोणेरे, (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये ई अ‍ॅण्ड टीसीमधून बीटेक पदवी घेतली आहे. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आल्यावर न खचता तिने अभ्यासात चिकाटी कायम ठेवली. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे यश तिला मिळाले. सध्या आयपीएसपर्यंत पोहचली असली तरी भविष्यात आयएएससाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने सांगितले.

मुलगा हिंदू, मुलगी मुस्लीम, मग मृत आईचा धर्म कोणता?; भाऊ- बहीण आपसात भांडले, शेवटी अंत्यसंस्कार असे झाले
आयएएस, आयपीएस होणं हे अनेक मुलांच स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं पुणे तसेच दिल्लीची वाट धरतात. मात्र, सातारसारख्या ग्रामीण भागात राहून प्रतीक्षा संजय कदम हिनं हे स्वप्न सत्यात उतरवलंय. तेही फक्त घरीच अभ्यास करून!

प्रतीक्षानं UPSC मध्ये साताऱ्याच्या नावाचा झेंडा फडकवत ५६० वा क्रमांक मिळवला आहे. खडतर अभ्यास करत तिनं मिळवलेल्या या यशाची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. सुरुवातीला २०१९ साली युपीएससीची परीक्षा तिनं दिली होती. मात्र यात तिला अपेक्षित यश मिळालं नाही.

IPL 2023: शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोलर्सकडून बलात्कार, हत्येच्या धमक्या; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
२०२० ला झालेल्या परीक्षेत अवघ्या ०.७९ मार्कांनी हुलकावणी दिल्यानंतर प्रतीक्षानं झालेल्या चुका सुधारत अविरत अभ्यास केला आणि शेवटी या परीक्षेत यश संपादन केलं. कोणताही क्लास न करता हा अभ्यास प्रतीक्षा कदम हिनं केला. यामुळं तिच्या या यशाला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. सातारा तालुक्यातील वळसे या छोट्या गावातील प्रतीक्षानं UPSC चा घरीच अभ्यास करत मिळवलेलं यश हे महाराष्ट्रातील इतर मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे.

धक्कादायक! पती-पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले, घरी परतलेच नाहीत, घटना समोर येताच संपूर्ण गाव हादरले
प्रतीक्षा कदम हिने या यशाचं श्रेय आई वडील‌ आणि भावाला दिलं‌ आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन हे महत्वाचं होतं. तिच्या काकांनी तसंच गावातील अनेकांनी पुस्तकांच्या स्वरुपात केलेली मदत आणि स्वत:चे अविरत प्रामाणिक प्रयत्न UPSC पास होण्यासाठी महत्वाचे ठरले, असं मत प्रतीक्षा कदम हिनं व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed