• Mon. Nov 25th, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट

    ByMH LIVE NEWS

    May 24, 2023
    राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट

    सातारा दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी किल्ले प्रतापगडास सहकुटुंब भेट दिली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह किल्ले प्रतापगडावरील ग्रामस्थ उपस्थित होते.

         राज्यपाल श्री बैस यांनी स्वतः पायी किल्ला चढून जाऊन गडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले व सहकुटुंब देवीची पूजा केली. तसेच गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. तसेच पंचायत समिती, शिक्षण विभाग, महाबळेश्वरच्या शिक्षकांनी अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला.

    शिवकालीन खेडेगावास भेट

    राज्यपाल श्री. बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली.

         शिवकालीन खेडेगाव येथे इतिहासाचे चांगले जतन केले आहे. या ठिकाणी पूर्वी लोकजीवन कसे होते हे पाहायला मिळाले. हा इतिहास भावी पिढीला पाहावयास मिळतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed