• Sat. Sep 21st, 2024

Maharashtra Police : राज्यातील पोलीस दलात मोठे बदल; निरीक्षकांना बढत्या तर उपअधीक्षकांच्या बदल्या

Maharashtra Police : राज्यातील पोलीस दलात मोठे बदल; निरीक्षकांना बढत्या तर उपअधीक्षकांच्या बदल्या

Maharashtra Police : एकाच पदावर कार्यकाळ पूर्ण करून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे २५३ उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेकजण मुंबईत बदल्या होऊन आले आहेत.

 

maharashtra police
राज्यातील पोलिस दलात मोठे बदल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या २५३ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. तर १४३ निरीक्षकांच्या बढतीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. राज्यातील सत्तांतर आणि सत्तासंघर्ष यामुळे या बदल्या आणि बढत्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी होती.राज्यातील गृह विभागामध्ये सेवाज्येष्ठता असलेल्या १७३ निरीक्षकांची सहायक पोलिस आयुक्त आणि उपअधीक्षक पदासाठी सन २०२१-२२मध्ये पात्रता तपासणी झाली. मात्र, त्यानंतर जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला तरी त्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले जात नव्हते. यामुळे त्यांच्यानंतर पदोन्नतीच्या रांगेत असलेल्या इतर अधिकाऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती. याचदरम्यान राज्यामध्ये सत्तांतर झाले व न्यायालयीन खटलाही सुरू झाला. एकमत होत नसल्याने या बढत्या रखडल्याची चर्चा पोलिस दलामध्ये होती.

‘ते’ सध्या काय करतात? नाशिक जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांवर प्रकाशझोत
अखेर मंगळवारी १४३ निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढतीचे आदेश गृह विभागाने जारी केले. यामध्ये मुंबईतील ४४ निरीक्षकांचा समावेश आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed