• Mon. Nov 25th, 2024

    आश्रमशाळेच्या लेखनिकाच्या मुलाची झेप, यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं, आई वडिलांचं नाव रोशन केलं

    आश्रमशाळेच्या लेखनिकाच्या मुलाची झेप, यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं, आई वडिलांचं नाव रोशन केलं

    जळगाव : वडील आश्रमशाळेत क्लार्क तर आई गृहीणी..मात्र माय बापाच्या कष्टांच चीज करत मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलं आहे. रोशन केवलसिंग कच्छवा रा. वरखेडे ता. चाळीसगाव असे युपीएसपीत यश संपादन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. रोशन आपल्या नावाप्रमाणे सार्थ कामगिरी करत देशभरातून ९३३ विद्यार्थ्यांमध्ये ६२० वी रँक मिळवून त्यांन आई बापासह त्याच्या गावाचं नाव रोशन केलं आहे.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मंगळवारी निकाल जाहीर झाला आहे. या निकालात जळगाव जिल्ह्यातील चार तरुणांनी यश संपादन करत देशपातळीवर जळगावचे नाव पोहोचविले आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील रोशन केवलसिंग कच्छवा या तरुणाचा समावेश आहे. रोशन कच्छवा याचे वडील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या धामणगाव येथील आश्रमशाळेत क्लर्क म्हणून नोकरीला आहेत. रोशन याने दहावीच्या परिक्षेत त्याला ९४ टक्के गुण मिळवत हुशार असल्याचं दाखवून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोशन याने पुण्याला इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. मात्र इंजिनिअरींगमध्ये त्याचे मन काही रमले नाही. त्याने इंजिनिअरींग चे शिक्षण अर्ध्यावर सोडून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात बीएसाठी प्रवेश घेतला.
    मुंबईकरांसाठी मोठी बातमी! शहरात आता ६ रेल्वे टर्मिनस, या स्टेशनवरही एक्सप्रेस ट्रेनला थांबा

    पहिल्याच प्रयत्नात यशाची हुलकावणी, नाऊमेद न होता जिद्दीने अभ्यास

    रोशन याचे आजोबा जिवंत असताना त्यांनी रोशन हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हावा असे, स्वप्न बघितले होते. यावेळी रोशन लहान होता, त्यानंतर आजोबांचा निधन झाल्यानंतर, रोशन याला आजोबांचे स्वप्न लक्षात होते, त्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोशन याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोशन याने अभ्यास करत जीवापाड मेहनत रोशन याने केली. कुठेही कमी पडू नये म्हणून त्याने खासगी क्लासेस सुध्दा लावले. पहिल्याच प्रयत्नात रोशन याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, यादरमयान शेवटच्या परीक्षेत त्याला यशाने हुलकावणी दिली आणि तो युपीएसपी होता होता राहिला. मात्र, पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून रोशन नाऊमेद झाला नाही. त्यानंतर उलट रोशन याने जिद्दीने अभ्यास केला. आणि दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आणि आपल्या दिवंगत आजोबांचे स्वप्न पूर्ण करत, रोशन याने आजोबांना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे.

    विजय शंकर मांकडिंग आऊट होता होता वाचला, दीपक चहरच्या चालाखीवर धोनीने दिली अशी रिअ‍ॅक्शन

    रोशन याने घेतलेला निर्णय हा सार्थ करुन दाखवला

    रोशन याच्या या यशामुळे वरखेडे या सारख्या छोट्या गावाचं नाव देशपातळीवर पोहचले आहे. रोशन याला आई-वडिल,भाऊ तसेच काका विक्रमसिंग कच्छवा यांचे वेळावेळी मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले. युपीएससी परिक्षेत गगनभरारी घेत यश मिळवणाऱ्या रोशन कच्छवा याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर रोशन याने पदवी करत केंद्रीय आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करण्याचा घेतलेला निर्णय हा त्याच्या कुटुंबासह नातेवाईक तसेच मित्र परिवाराला अचंबित करणारा असाच होता. मात्र, खडतर परिस्थिती अन् असंख्य अडचणींचा सामना करत रोशन याने त्याचा घेतलेला निर्णय हा सार्थ करुन आभाळाला ठेंगण केलं आहे. रोशन याची कहाणी ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे, यात शंका नाही. या यशाबद्दल रोशन याच्यावर सर्वत्र कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुण सुध्दा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षेत यश संपादन करु शकतात हेच रोशन याने या यशातून सर्वांना दाखवून दिलं आहे.

    २००० च्या नोटा सोडा, रिझर्व्ह बँकेला आणायच्या होत्या ५ हजार आणि १० हजाराच्या नोटा, पण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed