• Sat. Sep 21st, 2024
वडिलांचे छत्र हरवले, आईच्या कष्टाचं पोरीनं केलं चीज, पहिल्याच प्रयत्नात पोलिसात भरती शिरुरची लेक

पुणे (शिरूर) : आपल्या आजू बाजूला आपल्याला अनेक लोकांची परिस्थिती बिकट असल्याची पाहतो. त्यात जर डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले तर त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलतो. आई वडील मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व:ताच्या स्वप्नांचा त्याग करतात. मात्र, आपल्या मुलीचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आईने नवऱ्याच्या पाठीमागे काबाड कष्ट करून मुलीला पोलीस भरतीला पाठवले. मुलीने देखील आपल्या आईच्या कष्टाचं चीज करत पहिल्याच प्रयत्नात पोलीस झाली.

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावातील वैष्णवी भरत अवचीते या मुलगी पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात भरती झाली आहे. तिच्या आईने घाम गाळून जे कष्ट केलं त्या कष्टाचं चीज झालं आहे.

UPSC Result: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली
वैष्णवीची घरची परिस्थिती पहिल्यापासून नाजूक आणि आजी ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होती. वयामुळे कामातून सेवानिवृत्त झाली. तर वडिलांचे चार वर्षापूर्वी निधन झाले त्यामुळे घरची सर्व जबाबदारी आईवर आणि वैष्णवीवर होती. वडील सोडून गेल्यानंतर घरचा मोठा आधार तुटला होता. घरातला कर्ता माणूसच नसल्याने पती गेल्याचं दुख: असतानाही मुलांच्या भविष्याचा विचार करत या आईने कमरेला पदर खोचून मिळेल ते काम करून मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

वैष्णवीला एक भाऊ आणि एक लहान बहीण, आजी, आई असा परिवार आहे. आई मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत असे, त्यामुळे आई कामाला गेल्यानंतर घरची सर्व जबाबदारी वैष्णवीवर असायची त्यात पैशांची चणचण सतत जाणवायची. घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी शिक्षण घेण्याची जिद्द वैष्णवीला शांत बसून देत नव्हती. वैष्णवीसह भावडांचा शिक्षणाचा प्रश्न पुढे उभा ठाकला. शेवटी आई ती आई हार मानेल तेव्हा ना… रात्रंदिवस काम करून कष्ट करत तिन्ही मुलांचे शिक्षण चालू ठेवले. घरात आई एकच व्यक्ती कमावत असल्याने शिक्षण घेताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण भासत असे. आईला मदत म्हणून वैष्णवी हिचा भाऊ आदित्य कंपनीत कामाला जाऊ लागला. हे सर्व मुलगी वैष्णवी पाहत होती.

पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वैष्णवीने पोलिसांत भरती होण्याचा चंगच बांधला. त्यात पुढे आईचे आणि भावाचे कष्ट दिसत होते. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत पोलिसात भरती व्हायचे आणि आईच्या हाताला आराम द्यायचा, असा ध्यास मनात ठेवून तिने तयारी सुरु केली. पोलीस भरतीच्या तयारीसाठी अॅकॅडमीची फी भरण्याएवढी देखील वैष्णवीची परिस्थिती नव्हती. त्यामुळे तिने पहिल्यांदा घरीच सराव सुरु केला.

काही कालावधीनंतर वैष्णवी हिचे मार्गदर्शक अंकुश डफळ आणि प्रसाद डफळ यांची भेट झाली. त्यांनी अल्प मानधनात वैष्णवीचा पोलीस भरतीचा सराव सुरु केला. घरचे सर्व काम करून अॅकॅडमीत रोजच्या गाडीने जाणे, घरची कामे करणे यामुळे वैष्णवी थकून जात होती. पण भरतीची ओढ झोपू देत नव्हती. सततचा अभ्यास लाईट गेल्यानंतर दिव्याच्या प्रकाशात देखील वैष्णवी अभ्यास करायची. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांच्या अथक प्रयत्नात वैष्णवी पहिल्याच प्रयत्नात पोलिसांत भरती झाली.

तिच्या भरतीने तळेगाव ढमढेरे येथील पिंगळेनगर येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील पोलिसात भरती झालेली पहिलीच मुलगी असल्याने सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. वैष्णवीला किरण शिंदे, महेश धुमाळ, प्रसाद डफळ, अंकुश डफळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. निवडीनंतर पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना देखील पुढील स्पर्धा परीक्षा देणार असल्याचं वैष्णवीने सांगितलं आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १५०० वाहनं १५ मिनिटांत वळवली; ट्रॅफिक जॅमचं टेन्शन संपलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed