सांगली : भूत बाधा झाली म्हणून मुलाला मांत्रिकाकडे दाखवायला नेलं. पण भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने बेदम मारहाण केली. यामध्येच १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे. मांत्रिकाकडून झालेल्या मारहाणीमुळेचं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही तर यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातल्या इरली आर्यन दीपक लांडगे वय, वर्ष १४ या शाळकरी मुलाचा कर्नाटकातल्या एका मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे, आर्यन याला गेल्या काही दिवसांपासून सतत ताप येत होता. त्यामुळे तो आजारी होता. हा कोणता तरी भूतबाधेचा प्रकार आहे. हा संशय आर्यनच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाला होता. यातून आर्यनला कर्नाटक राज्यातल्या कुडची गावानजीकच्या शिरगुर, या ठिकाणी एका मांत्रिकाकडे नेलं होतं.
यावेळी या मांत्रिकांने आर्यन याच्या अंगात भूत शिरल्याचे सांगत भूत काढण्यासाठी आर्यनला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये आर्यनाला गंभीर इजा झाली. त्यामुळे जखमी झालेल्या आर्यन लांडगे याला नातेवाईकांनी मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना आर्यन याचा मृत्यू झाला आहे.
यावेळी या मांत्रिकांने आर्यन याच्या अंगात भूत शिरल्याचे सांगत भूत काढण्यासाठी आर्यनला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये आर्यनाला गंभीर इजा झाली. त्यामुळे जखमी झालेल्या आर्यन लांडगे याला नातेवाईकांनी मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना आर्यन याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन शहर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना याबाबतच्या तपास करण्याचे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ पोलिसांकडून आर्यन याच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर घटना ही कर्नाटक राज्यातल्या कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून प्राथमिक तक्रार घेऊन पुढे कुडची पोलीस ठाण्याकडे ती वर्ग करण्यात येईल, असं कवठेमहांकाळ पोलिसांच्कडून सांगण्यात आले आहे.
इतकंच नाही तर मृत आर्यन लांडगे याचा शवविच्छेदनाचा अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.