• Sat. Sep 21st, 2024
Chatrapati Sambhajinagar News: तरुणाने सिग्नल तोडला; पोलिसाने लाथा बुक्क्यांनी तुडवला, व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचा सिग्नल तोडल्यामुळे वाहतूक पोलिसाने एका तरुणाला निर्दयीपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शहरातील क्रांती चौकामध्ये ही घटना घडली असून हा धक्कादायक प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक हा सर्वात मोठा सिग्नल म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वाहनांची नेहमीच अधिकची वर्दळ बघायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच या चौकात वाहतूक शाखेचे पोलीस देखील तैनात करण्यात आलेले असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर या ठिकाणी उभे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दंडात्मक कारवाई करत असतात.

ब्रँडेड कपडे घालून मुलींना आकर्षित करायचा, नंतर करायचा धक्कादायक काम, शेवटी व्हायचे तेच झाले
मात्र, क्रांती चौकामध्ये असलेल्या सिग्नलवर एका दुचाकीस्वार तरुणाने सिग्नल तोडल्यामुळे एका वाहतूक पोलिसाने त्याला अडवलं. दरम्यान, त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि यामुळे कर्तव्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाने तरुणाला थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. भर चौकामध्ये सुरू असलेला हा प्रकार एका नागरिकाने स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होतं असून वाहतूक पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, मारामारीचे प्रकार करू नयेत अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

धक्कादायक! डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक, दीड वर्षात ९३ अल्पवयीन मुली गायब, कारणेही समजली
घडलेल्या प्रकाराबद्दल वाहतूक शाखेची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांची या प्रकरणी नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, असं असलं तरीही पोलिसांनी एखाद्या नागरिकाला भर चौकामध्ये अशी बेदम मारहाण करणे कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

धक्कादायक! पुण्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू, परिसरात एकच खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed