• Sat. Sep 21st, 2024

दाम्पत्याचा प्रांताधिकाऱ्यावर गंभीर आरोप, थेट इच्छामरणाची मागणी, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

दाम्पत्याचा प्रांताधिकाऱ्यावर गंभीर आरोप, थेट इच्छामरणाची मागणी, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sangli Couple Write Police Desire To Die News : शहरातल्या मिळकतीच्या जागेवर प्रांताधिकारी असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप पाटील दाम्पत्याने केला आहे. त्यांनी आता टोकाचे पाऊल उचलेले आहे.

 

sangli news
दाम्पत्याचा प्रांताधिकाऱ्यावर गंभीर आरोप, थेट इच्छामरणाची मागणी, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
सांगली : शहरातील एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छामरणाची परवानगीची मागणी केली आहे. तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.शहरातल्या दक्षिण शिवाजीनगर इथल्या जुन्या माळी चित्र मंदिराच्या मागील बाजूस सुनील पाटील यांनी २००६ मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली होती. त्याची रीतसर नोंद देखील केली. त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध कागदपत्रांनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकामध्ये २ हजार १०० स्क्वेअर फूट जागेची खरेदी झाली. यानंतर पाटील यांच्या असणाऱ्या भूखंडावर पूर्वेच्या बाजूने सुमारे ३०० स्केवर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागेवर शेजारी राहणाऱ्या गजानन गुरव यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे.

गजानन गुरव हे पंढरपूर या ठिकाणी सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आमच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याबाबत पाटील यांनी जागेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्या समवेत गुरव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
बांधकामाची परवानगी देतो, अडीच लाख द्या, मुख्याधिकाऱ्याने लाच मागितली अन् फसला….
गुरव यांनी आपल्या जागेवर आता बांधकाम केला आहे. याला महापालिकेकडून बांधकामाची परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पुन्हा आपल्या जागेच्या मिळकतीवरून आक्रमक झाले आहे. गुरव एक उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून पदाचा गैरवापर करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कारभार सुरू असल्याचा धारणेने न्याय मिळत नसल्याने पाटील दाम्पत्य हतबल झाले आहे. त्यांनी आता शेवटचा मार्ग म्हणून मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता सुनील पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छामरणाचा अर्ज दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याने इच्छा मरण द्यावे, अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे.
Sangli News: अंधश्रद्धांना छेद देण्यासाठी पूजाचे धाडस; सूर्यग्रहण पाहिले, दिला गोंडस ‘राजनंदनी’ला जन्म
दुसऱ्या बाजूला महापालिकेकडे तक्रार दाखल करूनही गुरव यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे मनस्तापाने आपल्या पतीला इच्छा मरण मागण्याची वेळ आल्याने पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट पालिकेच्या कार्यालयात जाऊन महापौरांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
गौतमी पाटील गावात येतीये, २ दिवस सुट्टी द्या, अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर
जागेच्या अतिक्रमणाबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ‘हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने आपण याबाबत काही बोलू शकत नाही’ असे स्पष्टीकरण गुरव यांनी दिले आहे. एकूणच या सर्व प्रकरणात पाटील दाम्पत्याने न्याय मिळत नसल्याने थेट आता मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. राज्य सरकारनेच या प्रकरणात लक्ष घालावं आणि संबंधित प्रांताधिकार यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी देखिल पाटील दांपत्याने केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed