• Sat. Sep 21st, 2024
मी भीक मागतो, आर्यनला सोडा; शाहरुखने जेव्हा वानखेडेंना मेसेज केला होता, नेमकं चॅटिंग काय..?

मुंबई : कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या खंडणीच्या आरोपावरुन नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहेत. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तत्पूर्वी सीबीआयच्या चौकशीला हजर न राहता समीर वानखेडे यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली. आज सुनावणीवेळी वानखेडे यांच्या वकिलांनी थेट शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील मोबाईल चॅटच न्यायालयात सादर केलं…सीबीआयचे आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही त्याच्यासोबतचे चॅट न्यायालयात सादर केले. एक बाप दुसऱ्या बाजूला मुलाची काळजी घ्या म्हणून आर्जव करतो आहे. जर वानखेडे यांनी खंडणी मागितली असती तर शाहरुखने त्या मेसेजमध्ये पैशांचा उल्लेख केला असता. पण त्याने असा कोणताही उल्लेख न करता लेकाची काळजी घ्या, असाच सूर त्याच्या संबंधित मेसेजमध्ये होतो, असं वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितलं. दरम्यान, समीर वानखेडे यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

शाहरुख-वानखेडे यांच्यामध्ये ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चॅटिंग काय झालं…?

शाहरुखचा समीर वानखेडे यांना मेसेज : साहेब मला तुमच्याशी बोलायचंय.. प्लीज मी बोलू शकतो का?एक वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का?

समीर वानखेडे यांचा शाहरुखला मेसेज : प्लीज कॉल करा…

शाहरुख आणि समीर वानखेडे यांच्यात फोनवरुन बोलणं होतं…

पुन्हा शाहरुखचा मेसेज : तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेले विचाराबद्दल आणि काढलेल्या उद्गाराबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि खात्रीही देतो की माझा लेक आर्यनला मी असा माणूस बनण्याचा मी प्रयत्न करेन ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. मी तुम्हाला याची खात्री देतो. देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू तरुण आपल्यावा हवे आहेत. तुम्ही आणि मी आपली जबाबदारी पार पाडली आहे, ती जबाबदारी पुढची पिढीही पाळेल. भविष्यासाठी या तरुणांमध्ये बदल घडवून आणणे आपल्या हातात आहे. आपण मला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. अल्लाह तुम्हाला खूप आशीर्वाद देवो…

समीर वानखेडे यांचा मेसेज : माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत….

शाहरुख खानचा वानखेडे यांना मेसेज : आपण खूप छान व्यक्ती आहात, पण प्लीज माझा लेक आर्यनवर दया दाखवा… जेलमध्ये त्याच्याकडे लक्ष राहूद्या… मला आपल्याला भेटायची इच्छा आहे. जेव्हा आपणाला वेळ असेल तेव्हा कळवा, आपण भेटुयात… मला मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा सदैव ऋणी राहील.

त्याला तुरुंगात राहू देऊ नका अशी मी विनंती करतो. तो तुरुंगात राहिला तर तो माणूस म्हणून मोडेल. त्याचा आंतरात्मा वेगळा विचार करेन. प्लीज मी भीक मागतो, तुम्ही त्याला तिथे जास्त दिवस ठेऊ नका. त्याला लवकर घरी पाठवा नाहीतर तो पूर्ण उद्धवस्त होऊन जाईल. तुम्हालाही माहिती आहे, त्याच्यासोबत जरा जास्तच घडलंय… प्लीज प्लीज मी तुला बाप म्हणून भीक मागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed