• Sat. Sep 21st, 2024
दुसऱ्यांवर आतापर्यंत देशद्रोह झाला असता, कुरुलकर आहे म्हणून शांत? भाजपने अखेर चुप्पी तोडली!

मुंबई : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना चार मे रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून दहशतवादी विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी आहे. मात्र डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणावर आतापर्यंत भाजपने चुप्पी साधली होती. याच गोष्टीचा धागा पकडून भाजपला सोशल मीडियावरुन नेटकरी सवाल करत होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपवर याच प्रकरणावरुन तोफ डागली होती. दुसऱ्यांवर आतापर्यंत देशद्रोह झाला असता, कुरुलकर आहे म्हणून भाजप शांत आहे. एव्हाना दुसरं आतापर्यंत कुणी असतं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता, असं आव्हाड म्हणाले. एकूणच भाजपने या प्रकरणावर शांत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र सर्वत्र टीकेनंतर भाजपने पहिल्यांदाच यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.भाजप प्रदेश कार्य समिती बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. कुरुलकर प्रकरणावरुन माध्यमांनी बावनकुळेंना काहीसे अडचणीचे प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना बावनकुळेंनी भाजपची सविस्तर भूमिका मांडली.

कुरुलकर अडकले, त्या मेसेजने निखिल शेंडे सापडले, कुटुंबियांच्या खळबळजनक आरोपाने नवा ट्विस्ट
कुरुलकर आहेत म्हणून भाजप शांत आहे का?

कुटुंबातील किंवा परिवारातील एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी संपूर्ण परिवार किंवा विचारधारा चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डीआरडीओचे संचालक मांडली. डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंधांबाबत भाजपने सावध भूमिका घेतली होती. समीर वानखेडे असो की कुरुलकर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी सुरू असल्याने त्याबाबत बोलता येणार नाही, असं बावनकुळे यांनी सांगितले.

भाजप आणि संघ परिवाराशी डॉ. प्रदीप कुरूलकर संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला नाही, असं निरीक्षण बऱ्याच जणांनी नोंदवलं. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “यासंदर्भात चौकशी सुरू आहे. कुटुंबातील किंवा परिवारातील कोणी गुन्हा केला तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. त्यासाठी कुटुंबाला किंवा परिवाराला जबाबदार धरता येणार नाही. गुन्हा करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे”.

काम केलं तर सत्कार करेन, नाही केलं तर नारळ देऊन घरी पाठवेन, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम
आवश्यकतेनुसार चौकशी

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलचा न्यायवैद्यकीय अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांच्या अन्य एका मोबाइलमधील संवेदनशील माहिती १५ मे रोजी उपलब्ध झाली आहे. त्या अनुषंगाने तपासासाठी आवश्यकता भासल्यास एटीएसचे अधिकारी कुरुलकर यांची कारागृहात जाऊन चौकशी करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुरुलकरांनी व्हॉट्सॲप केलेले डिलीट

डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या एका मोबाइलमधील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलीट केले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचा एक मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेला ‘डिकोड’ करता आला नाही. त्यामुळे एटीएसने तो मोबाइल ताब्यात घेऊन कुरुलकर यांना पासवर्ड नमूद करण्यास सांगून अनलॉक केला होता. त्या मोबाइलमध्ये कुरुलकर यांचे सीमकार्ड टाकले. त्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलीट केले असल्याचे दिसून आल्याने एटीएसने पुन्हा ते डाउनलोड करून त्यांच्या क्रमाकांचे व्हॉट्सॲप सुरू केले आणि त्याचा बॅकअप घेतला. त्यातून महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed