• Mon. Nov 25th, 2024
    नाशिक हळहळलं! पुढच्या वर्षी होती सरपंच पदाची संधी, पण काळ आडवा आला; शेतात गेल्या अन्…

    नाशिक : जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर व ३२ असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांच्या या मृत्युने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सकाळच्या सुमारास नंदा चतुर या स्वतःच्या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी पाईप टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला. स्व:तला सावरून न शकल्याने त्या पाण्यात पडल्या. यावेळी त्यांना बाहेर न पडता आल्याने दुर्दैवी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नंदा चतुर्थी या सकाळी लवकर उठून शेततळ्याकडे गेल्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्या घरी बराच वेळ होऊन देखील न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.

    Murder News : रागात हातपाय तोडून खून, चूक कळताच पेटवलं; जन्मदाता बाप, सख्खा भाऊ अन् लेकच ठरला काळ
    याबाबत विवाहितेचे पती योगेश रावसाहेब चतुर यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. नंदा चतुर यांच्या दुर्दैवी मृत्यू ना त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

    कांद्याच्या वखारीत सुरू होता भलताच खेळ; पोलिसांनी सापळा रचून टाकला छापा; पाहताच फुटला घाम
    मयत नंदा चतुर यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंदा चतुर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. मीठसागरे ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी रोटेशन पद्धतीने सरपंच उपसरपंचाची निवड होते. ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी महिला राखीव असल्याने पुढील वर्षी त्यांना सरपंच पदाची संधी मिळणार होती. परंतु त्या अगोदरच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

    पत्नी मग मेहुणी नंतर ४ वर्षाच्या लेकीवरही लैंगिक अत्याचार, नराधम पतीला अखेर अशी घडली अद्दल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *