• Mon. Nov 25th, 2024

    वहिनी, चला माहेरी सोडतो; पतीसोबत वादानंतर घर सोडून निघाली, बीडमध्ये विवाहितेवर अत्याचार

    वहिनी, चला माहेरी सोडतो; पतीसोबत वादानंतर घर सोडून निघाली, बीडमध्ये विवाहितेवर अत्याचार

    बीड : क्षुल्लक कारणावरुन पतीसह वाद झाला आणि विवाहितेने बॅग भरुन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी घराच्या बाहेर पडलेल्या महिलेला एका युवकाने गावी सोडण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवले. त्यानंतर तिची परिस्थिती ऐकून संधीचा गैरफायदा घेतला. तरुणाने महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. आरोपी युवकाला अटक करण्यात आली असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.पतीसह किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि यातूनच विवाहितेने माहेरी जाण्याचा विचार केला. काही क्षणातच महिलेने आपले कपडे, साड्या बॅगेत भरून माहेरचा रस्ता धरला. मात्र यावेळेस सतत लक्ष ठेवून असलेल्या एका व्यक्तीने या गोष्टीचा फायदा घेतला.

    गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड
    “मी तुम्हाला तुमच्या माहेरी सोडतो, तुम्ही माझ्यासोबत माझ्या दुचाकी वर चला” असं म्हणत आरोपी विशाल रवींद्र कदम (वय वर्ष २२, राहणार शहाबादपूर तालुका जिल्हा बीड) या व्यक्तीने त्यांना विनवणी केली. रागाच्या भरात संतापलेल्या त्या महिलेने त्याच्या गाडीवर बसत आपल्या माहेरची वाट धरली.

    सासवड-जेजुरी रस्त्यावर अपघात; संकटमोचक म्हणून धावून आल्या सुप्रियाताई, अपघातग्रस्तांना धीर देऊन केली मदत

    रस्त्यातच आरोपीने या सगळ्या गोष्टीच्या चर्चेचा आढावा घेतला. अर्ध्या रस्त्यातच एका निर्मनुष्य ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पलायन केलं.

    पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय

    या घटनेनंतर ज्या पतीसह वाद झाला, त्याच्याकडेच परत जाऊन महिलेने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठले. पीडितेने सांगितल्याप्रमाणे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाकडून आरोपीला पाच दिवसांची कोठडी देखील देण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed