• Sat. Sep 19th, 2026

लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या होत्या. यापैकी सात मुली बुडाल्या होत्या. परंतु पाच जणींना स्थानिकांनी वाचवले असून दुर्दैवाने दोघींचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार मूळ बुलढाण्याच्या रहिवासी असलेल्या नऊ मुली या खडवासला येथे लग्न कार्यासाठी आल्या होत्या. लग्न कार्यालयाचा मंडप हा धरणाच्या शेजारी होता. यावेळी खडकवासला धरणामध्ये मुली पोहोण्यासाठी गेल्या असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या सात मुली बुडत होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी पाच मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, तर दोन मुलींचा मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढला आहे. शासकीय रुग्णवाहिका १०८ घटनास्थळी दाखल होत्या.

गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड
दरम्यान कालच खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाल्याची माहिती आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू आहे. जुबेर इस्माईल शेख (वय २८ वर्ष, रा. भवानी पेठ, पुणे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed