• Mon. Nov 25th, 2024

    पंडित प्रदीप मिश्रांची कथा ऐकून घरी परतताना घात, आईच्या डोळ्यादेखत लेकानं जीव सोडला

    पंडित प्रदीप मिश्रांची कथा ऐकून घरी परतताना घात, आईच्या डोळ्यादेखत लेकानं जीव सोडला

    अकोला: जेसीबीने दुचाकीला उडवल्याने दुचाकीवर स्वार असलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना अकोला-पातूर रस्त्यावर घटना घडली असून जेसीबी चालकावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अकोला-पातूर महामार्गावरील म्हैसपूर येथे ‘पंडित प्रदीप मिश्रा’ यांच्या शिवमहापुराण कथा आटोपल्यानंतर घरी परतीच्या मार्गावर असताना वाटतेच त्यांचा अपघात झाला. यामध्ये ओमराज शिवहरी गावंडे (वय १६ रा. देऊळगाव, ता. पातूर, जि. अकोला) याचा जागीच मृत्यु तर त्याची आई जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला गेले होते

    गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोला-पातूर महामार्गावरील म्हैसपूर येथे पंडित प्रदीप मिश्रा (Pandit Pradeep Mishra) यांच्या शिवमहापुराण कथेला ५ मे पासून प्रारंभ झाला, आज ११ मेपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान पातुर तालुक्यातील देऊळगाव येथील ओमराज शिवहरी गावंडे (वय १६) आणि रुक्मिणीबाई शिवहरी गावंडे हे दोघेजण सकाळीच म्हैसपूर येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेले होते.

    वर्षभरापासून बहिणी घरात कैद, एक नग्नावस्थेत तर दुसरी पलंगाला खिळलेली, खोलीची अवस्था पाहून सारे हादरले
    रात्रभर मामाकडे थांबले

    कथा संपल्यानंतर दोघेही आई आणि मुलगा म्हैसपूर येथेच थोडा वेळ मामाकडे थांबले आणि काल सायंकाळच्या सुमारास देऊळगावकडे म्हणजे घराकडे रवाना झाले. दरम्यान, अकोला पातूर रस्त्यावर असताना समोरून आलेल्या जेसीबीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या धडकेत दोघेही मायलेक गंभीर जखमी झाले होते. या अपघातात दुचाकीचा अक्षरक्ष: चुराडा झाला होता.

    या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस स्टेशनचे रमाकांत केकन, नागरीक दुलेखान युसुफ खान, निशांत गवई, प्रमोद कढोणे यांनी घटनास्थळ गाठले होते. यावेळी त्यांना युवक आणि महिला गंभीर अवस्थेत पडून दिसले. दोघांनाही रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ओमराज गावंडे याला मृत घोषित दाखवले.

    एसटी चालकाचा महामार्गावर अंदाज चुकला अन् बस थेट रस्ते दुभाजकावर चढली; ४७ प्रवासी थोडक्यात बचावले

    जेसीबी चालकाचा निष्काळजीपणा मुलाच्या जीवावर बेतला

    अकोला ते पातूर हा रस्ता चौपदरी झाला असून, देखील जेसीबी चालकाने विरूद्ध दिशेने निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला उडवून दिल्याने हा अपघात घडला अन् १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेला जेसीबी चालक जबाबदार असल्याचा आरोप देऊळगाव येथील ग्रामस्थांनी केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed