• Sat. Sep 21st, 2024

Satara News: बाईकवरुन घराकडे निघालेले, वाटेत घात झाला; चार वर्षांची लेक पोरकी झाली

Satara News: बाईकवरुन घराकडे निघालेले, वाटेत घात झाला; चार वर्षांची लेक पोरकी झाली

सातारा : सातारा जिल्ह्यात पुणे – बंगळुरु आशियाई महामार्गावर वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दत्तात्रय मानसिंग पवार (वय ३३, रा. वेळे, ता. वाई, जि. सातारा) असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे.वेळे हे गाव आशियाई महामार्गावरच आहे. महामार्गावर गावातील लोकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. दत्तात्रय पवार हे दुचाकीवरुन घरी निघाले होते. ते माळ येथील छेद रस्त्यावरून घरी जात असताना पाठीमागून भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने न थांबता अपघात स्थळावरुन पळ काढला.

Solapur News: बाईकवरुन ट्रिपल सीट पुण्याला निघाले, पण वाटेत घात झाला; एकाच गल्लीतून निघाल्या ३ अंत्ययात्रा
सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे आणि यात्रा कमिटीचे आजीवन अध्यक्ष असणाऱ्या पवार यांच्या अपघाती मृत्यूने वेळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असं कुटुंब आहे.

एसटी चालकाचा महामार्गावर अंदाज चुकला अन् बस थेट रस्ते दुभाजकावर चढली; ४७ प्रवासी थोडक्यात बचावले

अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभ्यास स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस पुढील तपास करत आहेत.

बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त
वेळे हे गाव महामार्गावरच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आहेत. त्यामुळे वाहनधारकही मोठ्या प्रमाणात तिथे थांबत असतात. मात्र ही वाहनं महामार्गावरच पार्क केल्यामुळे अपघाताला नेहमीच आमंत्रण मिळत असतं. तसंच वेळे नागरिकांची शेतीदेखील महामार्गालगतच असल्याने त्यांना नियमित ये-जा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन उड्डाणपूल बांधण्यासाठी वेळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतर्फे महामार्ग प्राधिकरणाला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed