धाराशिव : संशयाचे भूत किती मोठा घात करू शकते याचे धक्कादायक उदाहरण धाराशिव येथे घडले आहे. परंडा तालुक्यातील सिरसाव येथील एका महिलेला आपल्या पतीवर संशय आहे. एक विधवा महिला आपल्या पतीस फोन करत असते असे तिला सारखे वाटत होते. संशय बळावल्यानंतर तिघा महिलांनी मिळून त्या विधवेस विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पीडित विधवा महिला ही बार्शी येथे उपचार घेत आहे. या ३ आरोपी महिलांविरुध्द परंडा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की. तू माझ्या नवऱ्याला फोन का करतेस, असे म्हणत विधवा माहिला मनिषा नवले यांना तिघा महिलांनी मारहाण केली. त्यानंतर तिला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना दिनांक ९ मे रोजी परंडा तालुक्यातील सिरसाव येथे घडली.
सिरसाव येथील मनिषा नवले या घरात बसल्या असताना गावातील प्रियंका दादा लटके, देवई तुकाराम लटके व प्रिती मुकुंद लटके या महिला मनिषा नवले यांच्या घरात आल्या. त्यांच्या हतातील मोबाईल घेऊन प्रियंका लटके यांनी तो पाण्यात टाकला. आपल्या पतीसोबत अनैतिक सबंध असल्याच्या संशयावरून तू माझ्या नवऱ्याला फोन का करतेस असे म्हणत तिघींनी नवले यांना मारहाण केली व गळा दाबला. यामध्ये मनिषा नवले यांच्या डोक्याला मार लागून त्या जखमी झाल्या.

‘तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत प्रिती लटके व देवई लटके यांनी मनिषा नवले यांचे हात धरले व प्रियंका लटके यांनी विषारी औषध पाजून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
विषबाधा झाल्याने व जखमी झाल्याने जखमी मनीषा नवले यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनीषा नवले यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जवाबावरून तीन महिला आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, कलम ३०७ सह विविध कलमांनुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ढगे हे करत आहेत.