छत्रपती संभाजीनगर: मी एका सरकारी रुग्णालयातून आलो आहे असं म्हणत एका महिलेच्या घरात शिरत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार सिल्क मिल कॉलनी परिसरामध्ये घडला आहे या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरले असून याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी महिला आपल्या कुटुंबीयांसोबत सिल्क मधील कॉलनी मध्ये राहते. दरम्यान ही महिला २५ एप्रिल रोजी घरी एकटीच होती. पीडित महिला घरामध्ये आपलं नियमित काम करत होती. महिला तिच्या कामांमध्ये व्यस्त असताना मिर्झा अशपाक बेग नावाचा व्यक्ती घरामध्ये शिरला.
यावेळी त्या व्यक्तीने महिलेला मी सरकारी रुग्णालयातून आलो असल्याचं सांगितलं. असं म्हणत अशपाक बेग हा घरामध्ये शिरला आणि पीडित महिलेशी अश्लील चाळे करू लागला. या प्रकारामुळे महिला गोंधळून गेली. महिलेने आरडाओरड केली. यावेळी आरोपी त्या ठिकाणाहून प्रसार झाला.

दरम्यान, घडलेला हा संपूर्ण प्रकार महिलेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. महिला प्रचंड घाबरलेली असल्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी महिलेला धीर दिला. दरम्यान याप्रकरणी सातारा पोलीस ठाणे गाठत महिलेने आपल्या सोबत घडलेल्या प्रसंग पोलिसांना सांगितला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.