• Sun. Mar 8th, 2026
    सावधान! मुंबई-पुणे महामर्गावर सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांची मोठी कारवाई; ३ जणांना अटक

    पिंपरी, पुणे : मुंबई – पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जबरी चोरी करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. गाड्या अडवून हे तिघेजण नागरिकांना लुबाडायचे. धमकी देऊन त्यांच्याकडील रक्कम काढून घेत त्यांना दमदाटी करायचे. याबाबत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले आहे. त्यामुळेअभिषेक लक्ष्मण भोसले (वय २० वर्षे रा. निर्मल बैतानी शाळेसमोर, विजयनगर, काळेवाडी, पुणे., विजय सिध्दार्थ म्हस्के वय २० वर्षे रा. शिंदे यांचे खोलीत, आझाद कॉलनी नं. ३. पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे, शांतकुमार चंद्रशेखर ददुल वय २० वर्षे रा. पाडाळे यांचे खोलीत क्रांती चौक, विजयनगर, काळेवाडी, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल
    याबाबत अधिक माहिती अशी की, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथकातील स्टाफ खाजगी वाहनाने पुणे- मुंबई महामार्गावर पेट्रोलींग करत असताना एका ग्रे रंगाची नंबरप्लेट नसलेली अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरुन ट्रिपल सीट जाताना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र ते न थांबता जावू लागल्याने त्यांचा संशय आला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

    Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
    यावेळी त्यांची तपासणी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड, एक लोखंडी कोयता व ०२ मोबाईल फोन असा एकुण ९५,२००/-रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशन करीत आहेत. दरम्यान, या टोळीला पकडल्याने संपूर्ण टोळीला पकडण्यात पोलिसांनी मदत होईल तर ही प्रवाशांसाठीही दिलासादायक बातमी आहे.

    Kolhapur Crime: याच मालमत्तेसाठी माय लेकासोबत झालं भयानक कृत्य, मुलाचा काटा काढला अन् आईसोबत बंगल्यात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed