• Fri. Nov 29th, 2024
    ठाण्यातल्या बाईंना विद्यार्थ्यांना शिक्षा करणं भोवलं, नोकरीच गेली, आयुक्तांनी आदेश काढले!

    ठाणे : शाळेची फी आणायला विसरलेल्या विद्यार्थ्यांना एका शिक्षिकेने शिक्षा द्यायची ठरवली. संबंधित शिक्षिकेने गृहपाठासारखं फी विसरणार नाही, हे ३० वेळा लिहून आणा, असे विद्यार्थ्यांना आदेश दिले. पण याच आदेशाने संबंधित शिक्षिकेची नोकरी गेली. या शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त यांनी दिले होते. त्याप्रमाणे, शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देवून चौकशी करत शिक्षण हक्क कायद्याने विद्यार्थ्यांना मानसिक अथवा शारीरिक इजा प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षिकेची चौकशी व्हावी असे स्पष्ट करण्यात आले.ठाण्यातील घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या एका तुकडीच्या विद्यार्थ्यांनी फी भरली नव्हती. तसेच विद्यार्थी फी घेऊन येण्यास विसरले होते. मात्र फी न भरल्यामुळे वर्गशिक्षिकेने या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही’ असे ३० वेळा लिहण्याची शिक्षा केल्याचे निष्पन्न झाले. ही संपूर्ण घटना उघड झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित शिक्षण अधिकारी यांना दिले होते.

    त्यानुसार, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी शाळेला भेट देवून चौकशी करत शिक्षण हक्क कायद्याने विद्यार्थ्यांना मानसिक अथवा शारीरिक इजा प्रतिबंधित करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने पुढील चौकशी होईपर्यंत त्या शिक्षिकेस निलंबित केले असल्याची माहिती राक्षे यांनी दिली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी शाळेला सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, चौकशीचा पाठपुरावा शिक्षण विभाग करीत आहे.

    यासंदर्भात, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जाच निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्रास होईल असं कोणतंही वागणं, कायद्याने प्रतिबंधित आहे. या परिस्थितीचा मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतो. तरी शाळांनी याचे भान राखणे गरजेचे आहे. असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed