• Sat. Sep 21st, 2024
शिवडी-न्हावाशेवाचा दुसरा टप्पा पूर्ण, मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुखकर

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी कमीत कमी वेळेत जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा (एमटीएचएल) या सागरी सेतूवरील दुसऱ्या टप्प्याची उभारणी शुक्रवार, ५ मे रोजी पूर्ण झाली. समुद्र व लाटांच्या भागातील ७.८० किलोमीटरचा या दुसऱ्या टप्प्यात समावेश होता. प्रकल्पातील अन्य दोन टप्प्यांची कामे ९३ टक्के पूर्ण झाली आहेत.मुंबईहून नवी मुंबईला जाणारा सध्याचा रस्ता मार्ग वाहतुकीच्या कोंडीने ग्रस्त आहे. या कोंडीपासून सुटका होण्यासाठी ७० टक्के समुद्रावरुन जाणारा शिवडी ते न्हावा-शेवा (एमटीएचएल) हा मार्ग मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभा करीत आहे. मुंबईत शिवडीहून सुरू होणारा हा मार्ग नवी मुंबईत उरणजवळील चिर्लेपर्यंत २१.८० किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील सुमारे १८.१८ किलोमीटरची मार्गिका समुद्रात आहे.

Deepa Mudhol: AC नको, खिडक्या उघडा, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा अनोखा निर्णय
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘टप्पा दोनमधील ३२ वी कमान शुक्रवारी समुद्रावर बसविण्यात आली. ऑर्थोपेडिक स्टील डेक, असे या कमानीला म्हटले जाते. हा गर्डर १३६ मीटर लांब असून १३७६ मॅट्रिक टन वजनाचा होता. या दुसऱ्या टप्प्यात ६५ मीटर ते १८० मीटरचे असे ३२ गर्डर उभारण्यात आले आहेत. असे एकूण ७० गर्डर या प्रकल्पात बसविले जाणार होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३८ व दुसऱ्या टप्प्यात ३२ आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी उद्घाटन केलं, ११ किमी मेट्रोला १२ वर्ष लागले, फडणवीसांनी झटक्यात विषय संपवला

एमटीएचएलचा पहिला टप्पा शिवडी ते समुद्रात १०.३८ किमी, दुसरा टप्पा १०.३८ किमी ते १८.१८ किमी (उरणपर्यंत) तर तिसरा टप्पा १८.१८ ते २१.८० किमीचा चिर्लेपर्यंत आहे. चौथ्या टप्प्यात मार्गावरील अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक प्रणालीशी निगडित कामे होणार आहेत.

अकलूजमध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed