जपानी भाषेत ३ प्रकारच्या लिपी असत्यात. त्यातील हिरागाना लिपी विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केलीय. त्यातील ५-५ अक्षरे शिकवून त्याचे वाचन व लेखन फावल्या वेळेत घेताहेत. प्रामुख्याने डीयूलींगो या app चा व युट्युबचा फायदा झालाय. एखादी बाब मी २ ते ३ दिवसात शिकलोय तर विद्यार्थी मात्र एका दिवसात ते शिकायचे हा अनुभव आल्याचे शिक्षक बालाजी जाधव यांना जाणवलेच सांगितले. विशेषतः इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सहजतेने शिकताना जाणवतय.
कोणतीही भाषा श्रवण, भाषण, संभाषण, वाचन व लेखन या प्रकारे उत्तम शिकता येते. मग आम्ही छोटे छोटे संवाद ४ ते ५ ओळीचे गटागटाने घ्यायला सुरुवात केली. मग अक्षरापासून छोटे शब्द तयार करून त्याचे वाचन व जपानी लिपीत छोटे छोटे शब्द लेखनातपण चांगली गती येऊ लागलीय. विद्यार्थी जपानी भाषेतील प्राणी, पक्षी, वार, महिने, फळे, फुले, नातेवाईक, कृती, दैनंदिन शब्द व वाक्य वाचन बोलणे हे सहजपणे करू लागले. साधारण ४ महिन्याचा या सर्व बाबी शिकण्यास वेळ लागलाय, असे येथील शिक्षक सांगतात.
यानंतर आम्ही अंक व गणिते यावर भर देऊन सर्व अंक मराठी व जपानी भाषेत वाचन, लेखन शिकलो व आजघडीला सर्व विद्यार्थी नुसते अंक ओळखतच नाहीत तर जपानी भाषेत त्याचे लेखन तर करतच आहेत, पण त्यापलीकडे जपानी भाषेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुद्धा करत आहेत, अशी माहितीही शिक्षकांनी दिली.
जर जपानी माणूस बोलताना दिसला, तर १०० टक्के आमच्या विद्यार्थ्यांना ते आत्ता समजू शकते. परदेशी भाषा शिकण्यास एकीकडे हजारो रुपये शिकवणी वर्गासाठी लोक घालवतात. मात्र इतक्या ग्रामीण भागात ही मुले अशी अभिनव शिक्षण घेत असल्याने पालक खूश आहेत.
लहान वयात मुलांना एक वेगळी परदेशी भाषा शिकण्याची संधी बालाजी जाधव यांच्यासारख्या सारख्या कल्पक शिक्षकामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त झालीय. दरवर्षी अशी एक वेगळी भाषा मुलांना दैनंदिन अभ्यासासोबत शिकवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितलंय.