• Sat. Sep 21st, 2024

९ वर्षांनी ३ गोष्ठी आठवल्या,शोध सुरु झाला, बहिणींना पाहताच पल्लवीच्या चेहऱ्यावर आनंद झळकला

९ वर्षांनी ३ गोष्ठी आठवल्या,शोध सुरु झाला, बहिणींना पाहताच पल्लवीच्या चेहऱ्यावर आनंद झळकला

नवी मुंबई : मुंबईतील परळच्या घरातून बेपत्ता झालेली पल्लवी साळवी (३४) या गतिमंद महिलेची अखेर नऊ वर्षांनी तिच्या बहिणीसोबत नवीन पनवेलमधील एका आश्रमात गळाभेट झाली. पल्लवी साळवी ही परळमध्ये राहत होती. मात्र मानसिक दुर्बलतेमुळे तिने चौथीतच शाळा सोडली. २००९ मध्ये तिने रॉकेल ओतून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. जानेवारी २०१४ मध्ये ती घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती.

२०१४ मध्ये गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत घरातील व्यक्तींनी खूप शोधाशोध केली, पोलिसांकडे तक्रार केली, पण ती काही सापडली नाही.दरम्यान पोलीस व काही नागरिकांनी तिला नवीन पनवेलमधील’सील’ या आश्रमात दाखल केले.आश्रमातील लोकांनी तिची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून तोडक्या मोडक्या भाषेत घरचा पत्ता मिळवण्यात त्यांना यश आले आणि त्यांनी तिची बहिणी अश्विनी महाडिक व किरण साळवी यांच्याशी संपर्क साधला.

याबाबत सील आश्रमचे फिलिप म्हणाले, ‘जेव्हा पल्लवीला खांदेश्वर पोलीस स्टेशन व नागरिक पिंकू राठोड,रूपेश कदम यांनी आश्रमात दाखल केले, तेव्हा ती पूर्णपणे विचलित झाली होती. तिचे मानसशास्त्रीय समूपदेशन केले. तिच्याकडून कुटुंबीयाची माहिती घेतली. त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना आश्रमात बोलावले. यावेळी बहिणी अश्विनी महाडिक आणि किरण साळवी शेल्टर होममध्ये येताच पल्लवीने त्यांना लगेच ओळखले आणि दोघांनाही मिठी मारली. पल्लवीला आता तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

इंद्रायणी काठी धक्कादायक प्रकार, वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागतंय केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी…!

मानसिक स्थिती सुधारली आणि तीन गोष्टी आठवल्या

पल्लवीनं नऊ वर्षानंतर सील संस्थेतील सामाजिक कार्यकर्ता जॉय जॉन यांना परेलच्या घराविषयी सांगितलं. त्यांना त्याच्या घराखाली असलेलं किराणा दुकान, गणेश मंदिर आणि दर्गा आठवत होता. त्यांनतर परळ शिवडी भागात आम्ही त्यांचा पत्ता शोधण्यासाठी गेल्याचं जॉन यांनी सांगितलं. शोधाशोध केल्यानंतर पल्लवी साळवी यांचं घर सापडलं, तिथं त्यांची बहीण किरण भेटल्या, पल्लवी जिवंत आहे समजात त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच,कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे; देवेंद्र फडणवीसांचं कोल्हापूरात सूचक वक्तव्य

अश्विनी महाडिक आणि किरण साळवी आश्रमात येताच पल्लवीनं त्यांना ओळखलं आणि मिठी मारली. अश्विनी आणि किरण यांनी पल्लवीला सांभाळल्याबद्दल आश्रमाच्या व्यवस्थापनाचं आभार मानले आहेत. सील आश्रमानं आतापर्यंत ४८८ जणांची त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून दिली आहे असं फिलीप यांनी सांगितलं.
वाढत्या महागाईत गृहिणीनं मोठा दिलासा; खाद्यतेलाच्या किमतीत कपात! जाणून घ्या नवीन किमती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed