• Mon. Nov 25th, 2024

    गिरीश बापटांच्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली, अधिकारी लागले कामाला

    गिरीश बापटांच्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली, अधिकारी लागले कामाला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ही जागा रिक्तच राहणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा स्तरावरील निवडणूक शाखेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी; तसेच ‘ईव्हीएम’ मशिनची तपासणी करीत निवडणूकपूर्व तयारी वेगाने सुरू आहे.खासदार बापट यांचे २९ मार्चला निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागी पोटनिवडणूक जाहीर होणार की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ही जागा रिक्तच ठेवली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कायद्यानुसार सहा महिन्यांहून अधिक काळ जागा रिक्त राहणार असेल, तर पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे.

    १० मे ला राष्ट्रवादीचं ठरेल, नंतर नव्या सरकारच्या घडामोडी, भूकंपाचा दावा कुणी केला?

    लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणे अपेक्षित आहे. ती अद्याप झाली नसली, तरी त्यादृष्टीने निवडणूक शाखेने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये विधानसभा मतदारसंघानिहाय सर्व नोडल अधिकारी, पर्यवेक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा आहेत की नाही, याचाही तपासणी करून लेखी अहवाल सादर करण्यात येत आहेत. प्रशासकीय गोटातून ही निवडणूक होण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

    Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णायक हालचाली, मंत्रालयातील २०-२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार

    पुण्यात भाजप भाकरी फिरवणार

    भाजपकडून लवकरच पुण्यातील शहर आणि जिल्हास्तरावरील पक्ष संघटनेमध्ये बदल केला जाणार आहे. १५मेपर्यंत राज्यातील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली जाईल. शहराध्यक्षपदाचा निर्णय फडणवीस, बानवकुळे; तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एकत्रित बैठकीत होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बीडकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावे आघाडीवर आहेत.

    जागा काँग्रेसकडे पण तयारी राष्ट्रवादीची, दादांच्या खास माणसाच्या गुडघ्याला बाशिंग!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *