• Sun. Mar 8th, 2026
    शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करुन खून, २९ वर्षीय आरोपीला शिक्षा, ४५ वर्षांनी इतिहास घडला

    रत्नागिरी/खेड : खेड तालुक्यात शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करून तिचा मृतदेह लपवल्याप्रकरणी नराधमाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला ही शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्ह्याच्या न्यायालयीन निर्णयाच्या इतिहासात ४५ वर्षांनी मरेपर्यंत फाशी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन बालकविरोधी गुन्हा करणाऱ्यांना कठोर संदेश देणारा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी दिली आहेखेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील ती सापडली नाही, म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै रोजी अल्पवयीन मुलीच्या डोक्याचा पट्टा गावातील एका इसमाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९ वर्ष) याला अटक केली होती.

    Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले
    पोलीस चौकशीत सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला या ठिकाणाची माहिती दिली. खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६ (आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला होता.

    ‘ती न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन निघून गेली’ म्हणत पतीने मुलीसह जीवन संपवलं

    येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. कोकण विभाग विशेष पोलीस महा निरीक्षक प्रवीण पवार तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग यांनी सहकार्य केले.

    Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…
    सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ श्री डी. एल. निकम यांनी मरे पर्यंत फाशी व वित्त दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed