• Sat. Sep 21st, 2024
शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादांनी अखेर ‘मनातलं’ सांगितलं!

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? याच्या जोरदार चर्चा आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. प्रामुख्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं पुढील पर्व सुरु असल्याची पक्षात चर्चा आहे. राजकीय विश्लेषक देखील तसे आडाखे बांधत आहेत. अजितदादाच पक्षाची सूत्रे हातात घेऊ शकतात, असा अनेकांचा अंदाज आहे. यावर पहिल्यांदाच अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.

मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, ते ही आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल.. असं जाहीरपणे अजितदादांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्रिपदाची इच्छा त्यांनी अजिबात लपवून ठेवली नाही. किंबहुना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मुख्यमंत्री होण्याची मनीषा बोलून दाखवत असतात. आता पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी दादांचं काय मत आहे? त्यांना अध्यक्ष व्हायला आवडेल का? हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. अशातच आपली ‘मन की बात’ अजित पवार यांनी सांगितली आहे.

शरद पवारांचा मोठा निर्णय, प्रफुल्ल पटेलांचा फोन गेला, तातडीनं मुंबईत या, बड्या नेत्याला बोलावणं धाडलं
अजितदादांनी अखेर सगळं सांगितलं

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे राष्ट्रवादीच्या अनेक घडामोडींचं केंद्र बनलंय. पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी युवक-युवतींनी तिथे ठिय्या मांडलाय. आज अजित पवार वाय बी चव्हाण सेंटर येथे आले असता पत्रकारांनी त्यांना गाठलं. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष व्हायला आवडेल का? शरद पवारांनी जर ठरवलं तर पक्षाची सूत्रे हाती घेणार का? असे प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले.

Sharad Pawar : तुम्हाला पुन्हा असं आंदोलनाला बसावं लागणार नाही, शरद पवार यांचे माघारीचे संकेत!
पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादा चिडले. अरे बाबा माझ्या अध्यक्ष होण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी अध्यक्ष होणार नाही… असं अजितदादा म्हणाले. त्यावर शरद पवार यांनी जर तुमच्याकडे जबाबदारी द्यायचं ठरवलं तर तुम्ही ती जबाबदारी घेणार का? असं विचारल्यावर अजितदादा म्हणाले, माझ्या मनात तो विचारही नाही आणि अध्यक्षपदाबाबत मला रसही नाही. त्यामुळे मी तो विचार करु शकत नाही.

१० मे ला राष्ट्रवादीचं ठरेल, नंतर नव्या सरकारच्या घडामोडी, भूकंपाचा दावा कुणी केला?
राष्ट्रवादीचा अध्यक्ष उद्या ठरणार, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

पवारांच्या निवृत्तीनंतर नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी त्यांनी एक समिती जाहीर केली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. या समितीची उद्या शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडतीये. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी समिती मागणी करणार आहे. पण जर पवारांनी निर्णय मागे घेतला नाही, तर नवा अध्यक्ष निवडीचं आव्हान समितीपुढे असणार आहे. सुप्रिया सुळे यांनी देश पातळीवर काम करावं तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्याकडे पक्ष सोपवावा, असं माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed