अरुण गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलं होतं. ते महात्मा गांधी यांचे नातू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. अरुण गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याचं काम केलं. ते पाच वर्षांचे असताना त्यांनी महात्मा गांधी यांना पाहिलं होतं. सेवाग्राम आश्रमात १९४६ च्या दरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केलं होतं.
अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र असून त्यांचे आजोबा महात्मा गांधी प्रमाणे सामाजिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. अरुण गांधी यांनीही लिहिलेल्या पुस्तकांपैकी ‘द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.तर, गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते.
अरुण गांधी यांचे पुत्र तुषार व त्यांचे नातेवाईक यांच्या संमतीने अरुण गांधी यांच्यावर वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड, येथील गांधी फौन्डेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या वेळेत अंत्यसंस्कार होणार आहे.ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजकीय पत्रकार जतीन देसाई यांनी ट्विटरवरुन देखील याबाबत माहिती दिली आहे.