• Sat. Sep 21st, 2024
संजय कुटेंना होम ग्राऊंडवर धक्का, शेगाव बाजार समितीत काँग्रेसचा झेंडा, मविआनं करुन दाखवलं

बुलढाणा : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. १८ जागांसाठी झालेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सहकार पॅनल आणि शेतकरी पॅनल मध्ये झालेल्या सरळ लढतीत, सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी मोठया फरकाने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे सहकार पॅनल होते. भाजप, शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांचे शेतकरी पॅनल होते. शेगाव मतदार संघ हा भाजपचा गड असून संजय कुटे हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे संजय कुटे यांना मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत ९८ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया स्थानिक मुरारका कॉलेजमध्ये पार पडली. सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत इतिहासात घडवला. सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत, शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवत शेगाव बाजार समिती मध्ये एका हाती सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीच्या एक हाती सत्ता आली असून शेगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

भटक्या जनावरांबाबत अजित पवारांचं खास शैलीत उत्तर, साहेब तुम्ही जनावरांचं बघा, मी कुत्र्यांचं बघतो…

विजयी उमेदवार…सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून श्रीधर पांडुरंग पाटील,गोपाळ वामनराव मिरगे, तेजराव भीमराव दळी,रमेश मनोहर उमाळे,योगेश एकनाथ थारकर, परमेश्वर विष्णू हिंगणे,दादाराव साहेबराव निळे, सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून मित्रवृंदा श्रीधर पुंडकर,अर्चना संजय शेळके , सहकारी संस्था विमुक्त भटक्या जाती मतदारसंघातून संतोष श्रीकृष्ण भारसाकडे,सहकारी संस्था इतर मागासवर्ग मतदार संघातून वासुदेव किसन धुमाळे , ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण मधून सुरेश नामदेव उन्हाळे, श्रीकांत सुखदेव तायडे, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून संजय महादेवराव गव्हांदे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघातून अमोल देवलाल लांजुळकर , व्यापारी अडते मतदारसंघातून विठ्ठल गजानन पाटील , रितेश ओमप्रकाश टेकडीवाल, तसेच हमाल मापारी मतदारसंघातून गुलाब खान भुरेखान, यांनी विजय मिळवला आहे.

मॉन्स्टर सिक्स मारायला एवढी ताकद येते कुठून? रोहितच्या प्रश्नावर काय म्हणाला यशस्वी जैस्वाल

शेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित असलेल्या शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सहकार पॅनलचे नेतृत्व सहकार नेते पांडुरंग दादा पाटील आणि काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी केले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एन. कोल्हे ,तर निवडणूक निरीक्षक म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे यांनी काम पाहिले.

अमेरिकन बँकिंग क्षेत्राला पुन्हा हादरा! आणखी एका महाकाय बँकेचे शटर डाऊन, आता पुढे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed