• Mon. Nov 25th, 2024
    काँग्रेसच्या एकमेव खासदाराविरोधात स्वपक्षीयांची भाजपशी आघाडी, धानोरकरांच्या पॅनलला भोपळा

    चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. या निकालांनी काही नेते सुखावलेत, तर काही नेत्यांचा तोंडचे पाणी पळाले आहे. बाजार समितींचा निवडणुकीत समोर आलेलं राजकारण बघून मातब्बरांचंही डोकं गरगरलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल बाजार समितीत राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर समर्पित शेतकरी महाविकास पॅनलला भोपळा मिळाला. चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले. या निवडणुकीत खासदार धानोरकरांच्या विरोधात स्वपक्षातील काही नेत्यांनी भाजपच्या सोबतीने आघाडी उघडल्याचे दिसून आले.चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाने टोक गाठलं आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले. मात्र खासदार बाळू धानोरकरांसाठी ही निवडणूक चिंतन करायला लावणारी ठरली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर याच्यातील कुरबुर जगजाहीर आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत धानोरकरांना घेरण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली अन् धानोरकर समर्पित पॅनलच्या अक्षरशः धुरळा उडवला.

    मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला
    मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप-काँग्रेसच्या या युतीवर “तो स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय” असं म्हणत हात झटकले. भाजप आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रकाश देवतळे चंद्रपूर बाजार समितीत मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करताना बँड बाजाचा तालावर थिरकले. चंद्रपूरच्या राजकारणात असं चित्र पहिल्यांदाच बघायला मिळालं. तर राजुरा बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि भाजपचे माजी आमदार एकत्र आलेत.

    ज्याचा गड त्याने राखला; APMC चे निकाल जाहीर, पंकजांकडून धनंजय मुंडेंचं अभिनंदन

    हा विजय कुणाचा?

    चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ बाजार समितीचे निकाल हाती आलेत. यापैकी चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीत भाजप काँग्रेस युती समर्पित पॅनलने विजय मिळवला. तर मूल बाजार समितीत काँग्रेसच्या संतोष रावत यांच्या पॅनलने खासदार बाळू धानोरकर समर्पित पॅनलला धूळ चारली. राजुरा, चंद्रपूर येथील विजय भाजपच्या खात्यात जमा होईल की काँग्रेसच्या? नेत्यांच्या या युतीमुळे एकमेकांना नेहमीच पाण्यात बघणाऱ्या या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची चांगलीच फजिती झाली आहे.

    राष्ट्रवादी नेत्याचा प्रयोग फसला, पाथर्डीत सत्तांतर, थोरातांच्या भाचेसुनेकडून सत्ता काबीज

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed