• Mon. Nov 25th, 2024
    राज्यावर २ मेपर्यंत अवकाळीचं संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

    मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत.

    या जिल्ह्यांना रेड अलर्ट

    भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार मराठावाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. २८ एप्रिल रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड सह अहमदनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    २९ फेब्रुवारीला अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    भूमीपुत्रांना लाठ्यांनी मारता, लोकशाही राज्यात असं वर्तन करायला पोलिसांना शरम वाटत नाही का? : राजू शेट्टी

    ३० एप्रिल रोजी विदर्भाील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाजा वर्तवण्यात आला आहे.

    १ मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, २ मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    Barsu Refinery : पोलिसांनी गाडीत कोंबलं, आंदोलकांचा पिंजऱ्यातून एल्गार, जीव मारा पण मागे हटणार नाही!

    मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात सलग तिसऱ्या रात्री नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. जालना तालुक्यातील विरेगाव, रामनगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली.

    दरम्यान, अवकाळी पावसाची आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

    तरच मी मुख्यमंत्री होईन… अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ‘वाढीव कार्यकर्त्यांना’ कायद्याची गोष्ट सांगितली!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *