• Sat. Sep 21st, 2024

अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका नवरदेव, नववधू आणि वऱ्हाडींना बसला. शहरातील अशोक चौक परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले. यामुळे वऱ्हाडी, नवरदेव आणि नववधू यांची मोठी फजिती झाली.मंगल कार्यालयात पाणी शिरल्याने सर्वांना खुर्चीवर उभं राहावं लागलं. हातात कट्यार, पायात मोजडी, अंगात जोधपूरी घातलेल्या नवरदेवाला देखील खुर्चीचा आधार घ्याला लागला. सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरातील एका मंगल कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी आईने आयुष्य संपवलं आता मुलाने लिहिलं – आयुष्याला कंटाळलो आहे, अन्…
मुस्लिम धर्मीयामध्ये रमजान आणि मोहरम महिन्यानंतर लगीनसराईचा काळ असतो. अशोक चौक परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका जोडप्याचं लग्न सुरू होते. अवकाळी पावसाने लग्नात विघ्न घातले.
सायंकाळी साडेचार वाजेपासून ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला विजांचा कडकडाट, वादळी वारा सुटला आणि पावसाची हलकी रिपरिप सुरू झाली. लग्न लावून देणारे काझीसाब यांनी देखील पावसाचा अंदाज घेत लवकर लग्न लावून दिले. मात्र, तासाभरात सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू झाला.

अमरावतीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; कुंड नदीला महापूर, गावांचा संपर्क तुटला

कुबुल है, कुबुल है, म्हणताच मंगल कार्यालयात पाणी शिरलं

शुक्रवारी झालेल्या अशोक चौक परिसरातील मंगल कार्यालयात कुबुल है, कुबुल है म्हणताच पावसाचे पाणी मंगल कार्यालयात शिरले. काही वेळातच मंगल कार्यालयाचे डबक्यात रूपांतर झाले. जेवणाची व्यवस्था केलेली होती, पण वऱ्हाडींना बसण्यासाठी जागाच नव्हती. काही जणांनी उभे राहून जेवण केले. नवरदेवासाठी खुर्ची आणून देण्यात आली. डबक्यात खुर्चीवर थांबून नवरदेव हे सारे दृश्य पाहत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed