• Sat. Sep 21st, 2024

कोकण-गोवा फिरायला आले, वाटेत बसची कारला जोरदार धडक, लहान मुलासह जालन्यातील ६ पर्यटक…

कोकण-गोवा फिरायला आले, वाटेत बसची कारला जोरदार धडक, लहान मुलासह जालन्यातील ६ पर्यटक…

रत्नागिरी:मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गोव्याकडून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला मोठा अपघात झाला आहे. खाजगी बस आणि पर्यटकांची कार यांच्यात हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. जखमी झालेले हे सगळे पर्यटक कोकण आणि गोवा फिरण्यासाठी आले होते. या सगळ्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरती कोदवली उपकेंद्रासमोर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कारमधील जखमी झालेले हे सगळे पर्यटक जालना येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात कारचालक हा अडकून पडला होता. मात्र, स्थानिकांनी त्याला मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
पन्हाळगडावर चिमुरडा कार खाली आला; रुग्णवाहिकेला चालक नाही, उपचाराला उशीर अन् सारंच संपलं
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारा खाजगी कारचालक आणि गोव्यावरुन मुंबईकडे जाणारी खाजगी आराम बस यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना तात्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

मोरवणे गावचे सुपुत्र शहीद अजय ढगळे पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलीने दिला मुखाग्नी

बस आणि कार यांच्यातील या अपघातात कारमधील जखमी झालेल्या पर्टकांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे, साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे हे सगळे जालना येथील राहणारे आहेत. हा अपघात झाल्यानंतर कोदवली परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

बीपी लो झाल्याने नियंत्रण सुटून डम्परला धडक, पुण्यातील महिलेची कार भररस्त्यात पेटली
या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी तात्काळ राजापूर पोलिसांच्या पथकाने धाव घेतली आणि मदतकार्यही सुरू केले. या अपघात प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed