• Sat. Sep 21st, 2024
उन्हात अंगाची लाही लाही, दोन महिलांची प्रकृती बिघडली; चंद्रपुरात आदिवासी समाजाचं आंदोलन पेटण्याची शक्यता

चंद्रपूर: अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन काल पासून सुरू केलं आहे. या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला आहे. उन्हामुळे आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. करिष्मा कुसराम आणि अर्चना कुळमेथे असं या महिलांचं नाव आहे.

आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५० टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा. अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काल अख्खी रात्र आंदोलनकर्त्यांनी जागून काढली.

पन्हाळगडावर चिमुरडा कार खाली आला; रुग्णवाहिकेला चालक नाही, उपचाराला उशीर अन् सारंच संपलं
आंदोलनाचा दुसरा दिवस सुरु आहे. मोठ्या संख्येने आदिवासी समाज पोंभुणा शहरात एकवटला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके हे करत आहेत. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी पोंभुर्णा शहर गाठले. आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील तापमान ४३.६ अंश सेल्सिअस होते. आजचे तापमान ४३ अंश सेल्सिअस होते. अशा तापमानातही हजारो आदिवासी बांधव आपल्या मागणीवर ठाम आहेत. वाढत्या तापमानामुळे आंदोलनकर्त्या अनेक महिलांचे आरोग्य खालावले आहे. तीन महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, “जीव गेला तरी चालेल, आमच्या मागण्या पूर्ण करा”, या मागणीवर आदिवासी समाज ठाम आहे.

वाहून जाणाऱ्या जवानांना वाचवताना वाशिमचे सुपुत्र अमोल गोरे शहीद, ४ वर्षांच्या लेकाकडून मुखाग्नी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed