• Sun. Sep 22nd, 2024
आईबाबा, चिनूजवळ मोबाईल द्या, तो वाचून दाखवेल, नोट लिहून इंजिनिअरिंगच्या तरुणाचं टोकाचं पाऊल

अमरावती: शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केलीये. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आईबाबा, चिनूजवळ मोबाईल द्या, तो वाचून दाखवेल, असे नमूद करीत एका नोट अॅपचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे मोबाइलवरील सदर अॅपवरूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल.

अनुराग मोहन तिखिले (२३) रा. चांदूरबाजार असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुराग हा कठोरा मार्गावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो कठोरा मार्गावरीलच हरिओम कॉलनी येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. बुधवारी दुपारी अनुरागने खोलीवर गळफास घेतला.

सोबत राहणारा मित्र खोलीवर आल्यावर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. मित्राने अन्य काही सहकाऱ्यांच्या मदतीने अनुरागला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. चिनूजवळ मोबाइल देजा, चिनू सर्वांना वाचून दाखवजो, असे नमूद करीत एका नोट अॅपचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी अनुरागचा मोबाइल आपल्या ताब्यात घेतला आहे. मोबाइलवरील सदर अॅप उघडून बघितल्यावरच अनुरागच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed