• Mon. Nov 25th, 2024
    अमीरोंकी स्कीम हात लगी है, कम दिन मे पैसा डबल; नवी मुंबईतील दाम्पत्याला ६ लाखांचा गंडा

    नवी मुंबई : स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळतो, असे आमिष दाखवून ६ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सोनाली नीलेश भेडे आणि नीलेश भेडे (रा. पळस्पे ) या दाम्पत्याच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधे हेरिटेज, पळस्पे येथे राहणाऱ्या अनघा योगेश कांबळे यांच्या सोसायटीत आरोपी सोनाली नीलेश भेडे राहतात. लॉरीकॉट या इन्व्हेस्टमेंट कंपनीत सोन्याच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दररोज नफा अकाऊंटमध्ये जमा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सोनाली भेडेचा पती नीलेशने अनघा कांबळे यांचे पती योगेश यांच्या मोबाइलवर ती लिंक पाठवली.

    लिंक ओपन करून लॉरीकॉट नावाचे अॅप कांबळेंनी डाऊनलोड केले व त्यात माहिती भरली. यावेळी फॉर्च्यून ग्रुप (७०७) या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन एमेंडा व अँड्रो या व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले. त्यानंतर लॉरीकॉट कंपनीमुळे त्यांच्या अकाउंटवर जवळपास ९८ हजार रुपयांचा फायदा झाला.

    काही दिवसांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एमेंडा व अँड्रो हे दोन अॅडमिन अचानक लेफ्ट झाले. त्यामुळे ग्रुपमधील लोकांना आपली फसवणूक झाल्याबाबत खात्री झाली.

    तुम्ही खूप चांगले होता, पण सॉरी, माझाच जरा…; लॉजवर व्यावसायिकाची बॉडी, जवळ चिठ्ठी सापडली
    यावेळी त्यांनी सोनाली भेडे हिला भेटून झालेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पोलिसात कशाला जायचे, आपण शांत राहू असे सांगितले. त्यानंतर बँकेत पगार काढण्यासाठी गेले असत तेलंगणा पोलिसांनी बँक अकाऊण्ट सीझ केले असल्याचे त्यांना समजले. तसेच तेलंगणा पोलिसांनी लॉरीकोर्ट कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ज्या अकाऊंटवर पैसे पाठवले होते, ते सर्व संबंधित अकाऊंटही सीझ केले असल्याचे कांबळे यांना समजले.

    नवरदेव आले, लग्नाची जोरदार तयारी पण वधुंचा पत्ताच नाही; चक्क २०० लग्नाळू पोरांची फसवणूक

    जास्तीत जास्त नफा मिळतो असे आमिष दाखवून स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडल्याप्रकरणी सोनाली नीलेश भेडे, तिचा पती नीलेश भेडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग ‘असा’ लागला छडा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *