पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी नागपूर जिल्ह्यात पाऊस कमी पडला. पेंच पाटबंधारे विभाग ांतर्गत येणाऱ्या तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी याच काळात सुमारे ९० टक्के जलसाठा होता. यंदा तो केवळ ६० टक्क्यांच्या आसपास आहे. पाटबंधारे विभाग दक्षिण अंतर्गत मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ९५ टक्के जलसाठा होता; यंदा तो ५५ टक्क्यांवर आला आहे. लघु सिंचन प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ९३ टक्के जलसाठा होता, यंदा ७२ टक्के आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांचा विचार करता गेल्यावर्षी ९१.११ टक्के जलसाठा होता; यंदा तो ५९.४१ टक्के आहे.
Dahi Handi 2026: दहीहंडीवेळी धक्का लागण्यावरून युवकांमध्ये राडा; पोलिसांनी दोघांना बाहेर काढले, डीजेच्या आवाजातही नियमांची चर्चारब्बीचे पीक अडचणीत
सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नसला तरी रब्बी हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिला. विहिरींनाही पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे. सोयाबीनसाठी शेवटचा पाऊस महत्त्वाचा असतो. पाऊस आला नाही तर दाणे भरले जाणार नाहीत आणि उत्पादन घटू शकते. कापूस आणि तुरीच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीसकॅरीओव्हरचे पाणी वापरावे लागेल
पिण्याच्या पाण्यासाठी सिंचन विभाग आधीपासून राखीव साठा ठेवतो. पुढील वर्षीही पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी हा साठा जपावा लागतो. मात्र, यापुढेही पाऊस झाला नाही तर कॅरीओव्हरचे पाणी वापरावे लागू शकते, असे सिंचन विभागाकडून सांगण्यात आले. यावर्षी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असली तरी महापालिकेने गळती रोखणे आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
धरणांची स्थिती अशी…
आकडे टक्केवारीत
धरणाचे नाव– यंदा– गेल्यावर्षी
मकरधोकडा– १८.५६%– १००%
खेकरानाला– ४६%– ९३%
वडगाव धरण– ५५.३०%– ९७%
पांढराबोडी– ५५.८३%– १००%
नांद धरण– ५५.९०%– ९८.२५%
तोतलाडोह– ५६.९९%– ८९.४३%
वेणा– ६४.३५%– ९३%
खिंडसी– ६६.४८%– ८१.२७%
