Dharashiv Wrestler Ashwini Paul Death Case : राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ हिच्या तिसऱ्या मुलीचा देखील मृत्यू झाला आहे. वीरा नावाच्या अडीच वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू होते. मात्र, तिने चार दिवसानंतर आपला जीव सोडला.
वीरा हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं
तिची प्रकृती गंभीर असल्यानेवीरा हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. या घटनेत अश्विनी पौळ अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी असलेल्या क्रांती पौळचा त्याच रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता या घटनेत चौथा मृत्यू झाला आहे.
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू
दरम्यान, अश्विनी पौळ आणि तीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले पती मनोहर पौळ व सासरा अंकुश पौळ यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं 9 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली होती. घटनेत अश्विनी पौळ आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या अडीच वर्षांची मुलगी क्रांती पौळ हिचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देत असलेली क्रांतीची जुळी बहीण वीरा पौळ हिचादेखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले
अश्विनी पौळ या महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीपटू होत्या. 2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर 2008 आणि 2009 मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कामगिरी केली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके मिळवली होती.
‘उलगुलान’ आता मुंबईकडे! मोर्चा काढण्याचा आदिवासी आंदोलकांचा निर्णय, सचिव-आयुक्त हटविण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम
लेकराच्या तोंडात चॉकलेटचा तुकडा
अश्विनी पौळ यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते. पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं वडिलांनी सांगितलं होतं. अश्विनी पौळ या केक घेऊन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. मुलांसह आगोदर केक कापला आणि त्यानंतर नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून पहिले मुलांना फेकलं, त्यानंतर स्वतः उडी मारली होती. किल्ल्यात केक कापायला बंदी असल्यानं केक आतमध्ये घेऊन जाता आला नाही. त्यामुळे अश्विनी पौळ यांनी बाहेरच केक कापला होता. यानंतर किल्ल्यात असलेल्या छोट्या दुकानातून मुलांसाठी चॉकलेट विकत घेतले. ज्यावेळी अश्विनी पौळ यांचा मुलगा अजिंक्य याचा मृतदेह हाती लागला तेव्हा त्याच्या तोंडात चॉकलेटचा तुकडा होता.
